अखेर प्रतीक्षा संपली! 'पंचायत 5' ची रिलीज डेट जाहीर; फुलेरा गावात पुन्हा रंगणार राजकारण आणि कल्ला!

वेब सिरिज विश्वात प्रचंड लोकप्रियता मिळवलेली 'पंचायत' या बहुचर्चित मालिकेच्या पाचव्या सीझनची तारीख अखेर समोर आली आहे. फुलेरा गावातील नवे राजकारण, प्रधानपती बनराकसचे नवे डाव आणि लाडक्या सचिवजींची धमाल पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही लोकप्रिय सिरिज आगामी ३ डिसेंबरपासून 'अमेझॉन प्राईम व्हिडिओ'वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मुंबई: ओटीटीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेली आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या द वायरल फीवर (TVF) ची बहुप्रतिक्षित कॉमेडी-फॅमिली ड्रामा वेब सिरिज 'पंचायत'चा पाचवा सीझन कधी येणार, याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. चाहत्यांची हीच प्रतीक्षा आता संपली असून निर्मात्यांनी 'पंचायत 5' च्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे ओटीटीप्रेमी आता फुलेरा गावाच्या दुनियेमध्ये पुन्हा एकदा रमण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्राईम व्हिडिओच्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवर पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे.

नवीन पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर


'पंचायत' वेबसीरीजचे सर्व सीझन प्राईम व्हिडिओ या ओटीटीवर रिलीज झाली आहे. आज 'पंचायत' वेबसीरीजच्या पाचव्या सीझनचा पोस्टर शेअर करत, ओटीटीप्रेमींसाठी गुड न्यूज देण्यात आली आहे. 18 नोव्हेंबर रोजी 'पंचायत 5' चे नवीन पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना खूशखबर देण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये जितेन्द्र कुमार, विकास, नीना गुप्ता यांच्यासह संपूर्ण स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. ही लोकप्रिय सीरिज येत्या 3 डिसेंबरपासून भारतासह जगातील 240 हून अधिक देशांमध्ये 'प्राईम व्हिडिओ' या ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे.





फुलेरामध्ये रंगणार सत्तेचा खेळ आणि नवीन राजकारण


मागील सीझनच्या शेवटी प्रेक्षकांना फुलेरा गावात अनेक मोठे राजकीय फेरबदल पाहायला मिळाले होते. आता 'पंचायत 5' मध्ये कथेचा नवीन आणि रंजक काळ सुरू होताना पाहायला मिळणार आहे. फुलेराला एक नवीन प्रधान मिळाला असून, आता नवीन प्रधानपती बनलेला 'बनराकस' गावात काय नवे डाव रचणार आणि कोणती नवी योजना आखणार, याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. बनराकस फुलेराचे चित्र बदलण्यात यशस्वी ठरणार की त्याचे सर्व आश्वासने केवळ देखावा ठरणार, याचे उत्तर या नव्या सीझनमध्ये मिळणार आहे. सत्तेतील बदलासोबतच गावातील आपसातली ओढाताण, हलके फुलके हास्य, भावनिक क्षण आणि स्थानिक राजकारणाची नवी समीकरणे प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासोबतच प्रेक्षकांना कथेसोबत खुर्चीवर खिळवून ठेवणार आहे.

जुनीच स्टारकास्ट पुन्हा झळकणार


या नवीन सीझनमध्ये प्रेक्षकांना त्यांचे लाडके कलाकार पुन्हा एकदा त्यांच्या आयकॉनिक भूमिकेत पाहायला मिळतील. यात जितेन्द्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, सुनीता राजवर, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार आणि अशोक पाठक यांसारख्या दिग्गज कलाकारांची संपूर्ण फौज असणार आहे. दीपक कुमार मिश्रा यांनी या सीझनचे दिग्दर्शन केले आहे, तर सिरिजची रचना दीपक कुमार मिश्रा, चंदन कुमार आणि अरुणाभ कुमार यांनी केली आहे. त्यामुळे येत्या ३ डिसेंबरला प्रेक्षकांना मनोरंजनाचा एक जबरदस्त डोज मिळणार यात शंका नाही.
Comments
Add Comment

Maan Marathi Movie: आशुतोष गोवारीकरांची पहिली मराठी निर्मिती 'मान'; 4 जून 2027 रोजी चित्रपट रिलीज

Maan Marathi Movie: काही दृश्यं शब्दांपेक्षाही अधिक प्रभावीपणे एखाद्या कथेची चाहूल देतात. भेगाळलेली जमीन, त्या जमिनीवरून

Madhavi Nimkar viral video: कोकणच्या मातीशी जोडली नाळ! अभिनेत्री माधवी निमकर गावाकडच्या परंपरेत रमली; हाताने जमीन सारवतानाचा व्हिडीओ चर्चेत

आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात गावाकडच्या साध्या-सुध्या गोष्टींचा आनंद काही वेगळाच असतो. मातीचा सुगंध,

मराठी चित्रपटाला हवी प्रभावी 'ब्रँडिंग'ची जोड! 'चित्रपताका' महोत्सवात दिग्गजांचा मोलाचा सल्ला

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम कथा आणि प्रतिभावान कलाकारांची कमतरता नाही; परंतु त्यांना योग्य प्रसिद्धी आणि

CallMeBae2 OTT Release: अनन्या पांडेच्या ‘Call Me Bae 2’ची रिलीज डेट जाहीर! डिसेंबरमध्ये ओटीटीवर रंगणार नवा धमाका

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आली आहे. अनन्या पांडेच्या लोकप्रिय वेब

Marathi Serial Updates: झी मराठीवर या आठवड्यात मनोरंजनाचा तडका; पाहा मालिकांमध्ये काय घडणार?

Marathi Serial Updates: मनोरंजन विश्वात प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या झी मराठीवरील मालिकांमध्ये सध्या अनेक मनोरंजक घडामोडी

Yavatmal Viral Boy: स्टायलिश लूक अन् रुबाबदार अंदाज! यवतमाळच्या रुद्रांशचा सोशल मीडियावर जलवा; व्हिडीओला 11 कोटी व्ह्यूज

सोशल मीडियाच्या जगात कोण कधी प्रसिद्ध होईल, याचा काही नेम नाही. दररोज हजारो व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड होतात. मात्र,