सर्व दहा संघांमध्ये 66 जागा शिल्लक!
आयपीएल 2027 स्पर्धेसाठी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर 66 जागा शिल्लक आहेत. त्यामुळे सर्व संघ मिळून 66 जागाच भरू शकतात. यात 25 विदेशी खेळाडूंसाठी जागा आहे. आयपीएल नियमानुसार, एक संघ आपल्या संपूर्ण स्क्वॉडमध्ये किमान 18 आणि कमाल 25 खेळाडू घेऊ शकतो. दरम्यान, गुजरात टायटन्सने सर्वाधिक 22 खेळाडू रिटेन केले आहे. चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनी 19 खेळाडू कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
IPL 2027: कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला सोडलं, आता कोण होणार कर्णधार?
आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्याला कारणंही तसंच आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल मिनी ...
कोणत्या फ्रेंचायझी किती पैसे शिल्लक?
आयपीएल मिनी लिलावात फ्रेंचायझींकडे खेळाडू घेण्यासाठी किती पैसे शिल्लक आहेत हे देखील महत्त्वाचं आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या पॉकेटमध्ये सर्वाधिक पैसे आहेत. लखनौ सुपर जायंट्सकडे 47.45 कोटी रुपये आहेत. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा नंबर लागतो. केकेआरकडे बोली लावण्यासाठी 41.65 कोटी रुपये आहेत. सनरायझर्स हैदराबादकडे 40 कोटी, दिल्ली कॅपिटल्स 39, मुंबई इंडियन्सकडे 32.60 कोटी, चेन्नई सुपर किंग्सकडे 28.05 कोटी, राजस्थान रॉयल्सकडे 27.05 कोटी, पंजाब किंग्सकडे 18.60 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे 14.15 कोटी आणि गुजरात टायटन्सकडे 8.75 कोटी रुपये आहेत. लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तीन संघांकडे 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी शिल्लक असल्याने लिलावात या संघांकडे मोठी बोली लावण्याची ताकद असेल.