AFSL 2026: अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग 21 व 22 नोव्हेंबरला रंगणार

पुण्यातील नामांकित क्लबच्या सदस्यांची उपस्थिती; आठ संघांतील 105 खेळाडूंचा सहभाग

अहिल्यानगर (प्रतिनिधी): शहरातील फुटबॉल खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देणाऱ्या अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग (ए.एफ.एस.एल.) 2026 च्या पाचव्या पर्वाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा येत्या 21 व 22 नोव्हेंबर रोजी नगर क्लबच्या मैदानावर रंगणार आहे. दिवस आणि रात्री अशा दोन सत्रांमध्ये फ्लडलाइटच्या प्रकाशात सामने खेळविण्यात येणार असून, शहरातील फुटबॉलप्रेमींना दोन दिवस स्थानिक खेळाडूंच्या कौशल्याचा आणि चुरशीच्या सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.


या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी ( ता. 21) संध्याकाळी होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत आठ संघांमधील 105 खेळाडू सहभागी होणार आहेत. विजेतेपदासाठी संघांमध्ये होणारी चुरस, खेळाडूंचे तंत्रकौशल्य, वेगवान खेळ आणि गोल करण्यासाठीची धडपड यामुळे स्पर्धेत चांगलीच रंगत निर्माण होण्याची अपेक्षा आहे. स्थानिक फुटबॉलपटूंना व्यावसायिक पद्धतीने खेळण्याची संधी मिळावी, त्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळावे आणि अहिल्यानगरमध्ये फुटबॉल संस्कृती अधिक मजबूत व्हावी, या उद्देशाने गेल्या चार वर्षांपासून या लीगचे आयोजन करण्यात येत आहे.(Ahilyanagar Football Super League)






यंदाच्या पाचव्या पर्वाचे विशेष आकर्षण म्हणजे पुण्यातील सिटी पुणे फुटबॉल क्लब आणि पुणे पायोनिअर्स फुटबॉल क्लबचे निवड समिती सदस्य स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत. ते दोन दिवस खेळाडूंच्या कामगिरीचे निरीक्षण करून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करणार आहेत. निवड झालेल्या गुणवंत खेळाडूंना संबंधित क्लबच्या संघात स्थान मिळविण्याची तसेच व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अहिल्यानगरमधील खेळाडूंना शहराबाहेरील मोठ्या फुटबॉल व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा केवळ मनोरंजन किंवा स्थानिक पातळीवरील स्पर्धा न राहता खेळाडूंच्या भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याची माहिती नमोह फुटबॉल क्लबच्या ओनर नमिता फिरोदिया यांनी दिली.


स्पर्धेपूर्वी नुकताच खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावामध्ये शहरातील गुणवंत फुटबॉलपटूंना आपल्या संघात घेण्यासाठी संघमालकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. खेळाडूंच्या कौशल्याचा विचार करून संघमालकांनी त्यांच्यावर लाखो रुपयांची बोली लावली. या प्रक्रियेमुळे स्थानिक खेळाडूंना व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेचा अनुभव मिळण्याबरोबरच त्यांच्या गुणवत्तेला आर्थिक आणि क्रीडाक्षेत्रातील महत्त्व प्राप्त होत आहे.(Ahilyanagar Super League)






यंदाच्या स्पर्धेत एमडी अँड आरडीएक्स इन्फ्रा, गुलमोहर चॅलेंजर्स, गांधी वॉरियर्स, डायनामिक स्ट्रायकर, एक्सलन्स अचिव्हर्स, विद्यादान अल्फा एक्स, डॉक्टर बायो आणि नवा मराठा योद्धा हे आठ संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत. या सर्व संघांमध्ये मिळून शहरातील 105 खेळाडूंचा समावेश आहे. संघमालक म्हणून ऋत्विक वाबळे, जोएब खान, चेतन गांधी, सिद्धार्थ मुनोत, आशिष टोटू, रोहित रामदिन, सचिन सेलोत, ॲड. ललित गुंदेचा, अभिनंदन आणि रुही भन्साळी जबाबदारी सांभाळत आहेत.
स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध संस्थांचे सहकार्य लाभत आहे. अभिनंदन आणि रुही भन्साळी (अवित्री मोशन) हे को-पॉवर, राजेश भंडारी (महावीर ग्रुप) किट स्पॉन्सर, तर प्रणिल मुनोत (कॉनप्लेक्स) को-स्पॉन्सर आहेत. या शिवाय राम एजन्सी, शिवम सायकल, फन्की लॅण्ड, अमित ट्रेडर्स, जलाराम फुड्स आणि खेलोफाय यांचेही सहकार्य लाभले आहे.


नगर क्लबच्या मैदानावर स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्‍यक तयारी वेगाने सुरू आहे. दिवसाच्या सामन्यांसोबतच रात्री फ्लडलाइटच्या प्रकाशातही सामने खेळविण्यात येणार आहेत. यामुळे प्रेक्षकांना दिवसा आणि रात्री फुटबॉलचा थरार अनुभवता येणार आहे. दुसरीकडे, सहभागी खेळाडूंचा सराव भाऊसाहेब फिरोदिया यांच्या मैदानावर सुरू असून, सर्व संघ अंतिम तयारीला लागले आहेत.(Maharashtra Football)

Comments
Add Comment

WTC 2025-27 Points Table: IND vs NZ कसोटी मालिकेपूर्वी गुणतालिकेत मोठा बदल; या दोन संघांना बसला फटका

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीची चुरस वाढली आहे. या स्पर्धत एकूण नऊ संघ होते आणि

नेमबाजीच्या मैदानाबाहेरही मनू भाकरचा धमाका! जागतिक स्तरावर मिळाली सर्वात मोठी जबाबदारी; आता थेट नियम ठरवणार!

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदकांची कमाई करून संपूर्ण देशाची मान उंचावणारी भारताची स्टार नेमबाज मनू भाकर आता जागतिक

अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा समारोप; नागपूरचा शौनक बडोले प्रथम

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : बुद्धिबळ खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने

IPL 2027 Retention: आयपीएल लिलावापूर्वी हेड, मिचेल स्टार्कसह दिग्गजांना दाखवला बाहेरचा रस्ता; पाहा सर्व 10 संघांची यादी

आयपीएल 2027 स्पर्धेच्या लिलावापूर्वी सर्व फ्रेंचायझींनी संघातून रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

चुकीला माफी नाही..! गुरनूर ब्रार आयसीसीने दिला दणका, टिम सैफर्टसोबत तसं वागणं पडलं महागात

भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून टी20 मालिकेनंतर वनडे मालिकेत विजय मिळवला. आता भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी

Mitchell Santner : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून न्यूझीलंडचा स्टार खेळाडू बाहेर, किवी संघाला मोठा धक्का

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या आगामी 2 सामन्यांच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप