श्रीलंका आणि पाकिस्तानचे किती गुण कापले?
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना रावलपिंडी येथेत खेळला गेला. हा सामना ड्रॉ झाला पण दोन्ही संघाना संथ गोलंदाजीसाठी दंड ठोठावला गेला. दोन्ही संघांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुण कापले गेला. श्रीलंकेचा संघ 15 षटकं मागे होता, म्हणून 15 गुण आणि पाकिस्तानचा संघ पाच षटकं मागे होता म्हणून 5 गुण कापले. श्रीलंकेला यामुळे जबर फटका बसला असून थेट आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. श्रीलंकेची विजयी टक्केवारी 33.33 टक्क्यावरून 15.47 टक्के झाली आहे. तर पाकिस्तान 3.33 टक्के विजयी टक्केवारीसह सर्वात शेवटी म्हणजेच नवव्या स्थानावर आहे.
IPL 2027 Retention: आयपीएल लिलावापूर्वी हेड, मिचेल स्टार्कसह दिग्गजांना दाखवला बाहेरचा रस्ता; पाहा सर्व 10 संघांची यादी
आयपीएल 2027 स्पर्धेच्या लिलावापूर्वी सर्व फ्रेंचायझींनी संघातून रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आयपीएल 2027 स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया 16 ...
भारत पाकिस्तानची स्थिती काय?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ 72.22 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ 51.52 विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले तर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेण्याची संधी मिळेल. भारताची विजयी टक्केवारी 58.97 टक्के होईल. तर न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरेल. न्यूझीलंडची विजयी टक्केवारी 54.17 टक्के होईल.