Thursday, November 19, 2026

रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेला आजपासून सुरूवात, जाणून भारताचा सामना कधी आणि पूर्ण शेड्यूल

रायझिंग स्टार्स आशिया 2026 स्पर्धेला गुरूवारपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चला जाणून घेऊयात या स्पर्धेबाबत...

रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. वनडे फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा होत असून एकूण 8 संघ सहभागी आहेत. चार संघाचे दोन गटत असून प्रत्येक संघाला साखळी फेरीत प्रत्येकी तीन सामने खेळायचे आहे. या गटातील टॉप 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील, तर उर्वरित दोन संघ स्पर्धेतून आऊट होतील. अ गटातील टॉप संघ ब गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी उपांत्य फेरीत लढत देईल. तर ब गटातील टॉपचा संघ अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी लढत देईल. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने क्रीडाप्रेमींना उत्सुकता आहे. कारण साखळी फेरीत दोन्ही संघ आमनेसामने येणार हे नक्की आहे. भारत ए संघाच्या कर्णधारपदाची धुरा तिलक वर्माच्या खांद्यावर आहे. तर अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी हे खेळाडू या संघात आहेत. वैभव सूर्यवंशीची टी20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी आहे, पण वनडे सामन्यांमध्ये तितकासा यशस्वी ठरलेला नाही. त्यामुळे, या मालिकेत वैभवचीही कसोटी लागणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

भारताचं या स्पर्धेतील वेळापत्रक

  • 20 नोव्हेंबर 2026: भारत ए विरुद्ध नेपाळ (दोहा)
  • 22 नोव्हेंबर 2026: भारत ए विरूद्ध पाकिस्तान ए (दोहा)
  • 24 नोव्हेंबर 2026: भारत ए विरुद्ध युएई (दोहा)
prahaar.in/2026/11/19/ind-vs-nz-1st-test-the-decision-to-bench-mohammed-siraj-was-the-right-batting-coach-sitanshu-kotak-explains-why/ या स्पर्धेतील पहिला सामना हाँगकाँग ए आणि बांगलादेश ए यांच्यात होत आहे. भारत ए संघाचे तिन्ही सामने दोहात असणार असून दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरूवात होईल. तर नाणेफेकीचा कौल दुपारी 3 वाजता होईल. भारताचे साखळी फेरीचे सर्व सामने 24 नोव्हेंबरला संपतील. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने होतील. उपांत्य फेरीचा पहिला सामना 26 नोव्हेंबर, तर दुसरा सामना 27 नोव्हेंबरला होईल. अंतिम फेरीचा सामना 29 नोव्हेंबरला होणार आहे. भारत ए स्क्वॉड: तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, कुमार कुशाग्र, प्रभसिमरन सिंह, रिंकू सिंह, आयुष बडोनी, हर्ष दुबे, शाहबाज अहमद, तनुष कोटियान, सूर्यांश शेडगे, हर्षित राणा, अरशद खान, विप्रज निगम, प्रिंस यादव.

भारतात कुठे पाहता येतील सामना?

रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर होईल. तर लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव एप आणि वेबसाईटवर होईल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >