पुनर्वसनाशिवाय प्रभादेवीतील अतिक्रमणांवर कारवाई नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर तोडकामाला स्थगिती

मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील 101अतिक्रमित बांधकामांवर पश्चिम रेल्वेने सुरू केलेली तोडकामाची कारवाई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

मुंबई : प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील १०१ अतिक्रमित बांधकामांवर तोडकाम करण्यासाठी आलेल्या रेल्वेच्या पथकाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर माघारी फिरावे लागले. रहिवाशांचे पुनर्वसन केल्याशिवाय कारवाई करू नये, अशी भूमिका घेत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर वैष्णव यांनी कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे तोडकामासाठी आणलेले जेसीबी परत गेले.


प्रभादेवी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रेल्वेच्या जागेवरील १०१ बांधकामांवर गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत कारवाई करण्याची तयारी पश्चिम रेल्वेने केली होती. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला होता. तोडकामाचे पथक जेसीबीसह परिसरात दाखल झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी कारवाईला विरोध केला. पुनर्वसनाची व्यवस्था केल्याशिवाय घरे रिकामी करणार नाही, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली. स्थानिक आमदार अजय चौधरी आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही रहिवाशांसोबत उपस्थित राहून कारवाई थांबविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस कारवाईवर ठाम होते.


या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याशी संपर्क साधून कारवाई थांबविण्याची मागणी केली. त्यानुसार रेल्वेमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर तोडकामाची कारवाई स्थगित करण्यात आली. पुढील कारवाई करण्यापूर्वी स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.






या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात एसआरए आणि रेल्वे मंत्रालयाची बैठक झाली होती. या बैठकीत आपण स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली होती. प्रभादेवीतील रहिवासी गेल्या ५० ते ६० वर्षांपासून तेथे वास्तव्यास आहेत. ते अलीकडे आलेले रहिवासी नाहीत. त्यामुळे त्यांचे योग्य पुनर्वसन करणे आवश्यक आहे. रेल्वे विभाग आणि गृहनिर्माण विभाग यांच्या समन्वयातून पुनर्वसनाची प्रक्रिया राबविण्याचे ठरले आहे. रेल्वेच्या आर अँड डी विभागाचे नियोजन आणि एसआरएचे धोरण यांच्या आधारे सविस्तर प्रकल्प अहवालही (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. हा आराखडा तयार होईपर्यंत कारवाई करू नये, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली होती.


मात्र, त्यानंतरही रेल्वेचे अधिकारी कारवाईसाठी प्रभादेवीत पोहोचले. त्यामुळे आपण तातडीने रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून बैठकीत ठरल्याप्रमाणे पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तोडकाम करू नये, असे त्यांना सांगितले. त्यानंतर वैष्णव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई थांबविण्याच्या सूचना दिल्या आणि तसे आश्वासनही दिले, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Kartiki Ekadashi 2026 Dadar: कार्तिकी एकादशीनिमित्त दादरमध्ये भक्तीचा जागर! 21 नोव्हेंबरला भव्य दिंडी सोहळा रंगणार

मुंबई: कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुंबईतील दादर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे.

Public Private Partnership: महापालिकेच्या नवीन रुग्णालयांमध्ये पीपीपी अंतर्गत् चांगल्याप्रकारे मिळणार सुविधा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात चांगली सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

Firecracker Ban: मुंबईत रॉकेट आणि आकाशात उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांवर बंदी; महापालिका प्रशासनाने दिले आदेश

मुंबई (विशेष् प्रतिनिधी): मुंबई महापालिका सभागृहात पुन्हा एकदा दिया मिर्झा यांच्या नावाचे फटाके फोडण्याच्या

महापालिकेच्या केईएम व नायर रुग्णालयात एमआरआय सुविधा , महापौर रितू तावडे यांच्‍या हस्‍ते झाले लोकार्पण

 मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई सेंट्रल येथील बाई यमुनाबाई लक्ष्‍मण नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला

अ‍ॅमस्टरडॅमच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अ‍ॅमस्टरडॅम नगरीच्‍या महापौर फेम्के हलसेमा यांनी आज,

भांडुप संकुलातील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कामाला गती; अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईची दीर्घकालीन जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने भांडुप नवीन जलशुद्धीकरण