Friday, November 20, 2026

Asia Cup Rising Stars 2026 : नाणेफेक नेपाळने जिंकली आणि भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी, कर्णधार तिलक वर्मा म्हणाला...

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारताचा पहिला सामना नेपाळशी होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण कर्णधार तिलक वर्माने मनासारखं झाल्याचं सांगितलं.

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि नेपाळ आमनेसामने आले आहे. साखळी फेरीत भारताचा पहिलाच सामना असून विजयी सलामी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. 50 षटकांच्या या स्पर्धेत भारताचं नेतृत्व तिलक वर्माच्या खांद्यावर आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा नेपाळच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. नेपाळचा कर्णधार लामिछाने म्हणाला की, 'आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी चांगली दिसते आहे. जर आम्ही प्रतिस्पर्ध्याला चांगल्या धावसंख्येवर रोखले, तर आम्हाला लक्ष्य गाठण्याची आशा आहे. एनपीएल सुरू असल्यामुळे संपूर्ण संघ उपलब्ध नाही. आमचे 12 खेळाडू येथे आहेत.'

काय म्हणाला कर्णधार तिलक वर्मा?

टीम इंडिया ए संघाचा कर्णधार तिलक वर्माने सांगितलं की, 'प्रथम फलंदाजी करायची होती. जे हवं होतं ते मिळालं. खेळपट्टी खूप चांगली दिसत आहे, पहिल्याच सामन्यात चांगली धावसंख्या उभारायची होती. सर्वजण खूप आत्मविश्वासात आहेत. हर्षित राणा, प्रिन्स, अभिषेक, वैभव हे खूप अनुभवी खेळाडू आहेत. वैभव तरुण आहे, पण तो किती प्रतिभावान आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. रिंकू उपकर्णधार आहे. एकच ध्येय आहे, प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रित करून स्पर्धा जिंकायची आहे.'

दोन्ही संघांची प्लेइंग 11

नेपाळ (प्लेइंग इलेव्हन): अर्जुन कुमल, कुशल भुर्तेल, बसीर अहमद, लोकेश बाम, दीपक डुमरे (विकेटकीपर), ललित राजबंशी, नंदन यादव, पवन सराफ, रशीद खान, संदीप लामिछाने (कर्णधार), प्रतिस जीसी.

भारत अ (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, रिंकू सिंग, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), शाहबाज अहमद, सूर्यांश शेडगे, विपराज निगम, हर्षित राणा, प्रिन्स यादव.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >