
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ही मालिका पाकिस्तानने 1-0 ने जिंकली. पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 8 गडी राखून पराभूत केलं. दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या डावात श्रीलंकेची दाणादाण उडली. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 98 धावांवर बाद झाला. तर पाकिस्तानने पहिल्या डावात 325 धावा करत 227 धावांची आघाडी घेतली. पाकिस्तानची आघाडी मोडून काढण्याचं मोठं आव्हान श्रीलंकेपुढे होते. श्रीलंकेने दुसऱ्या डावात 316 धावा केल्या आणि 89 धावा केल्या. यासह पाकिस्तानला दुसऱ्या डावात विजयासाठी 90 धावंचं आव्हान मिळालं. पाकिस्तानने हे आव्हान 2 गडी गमवून पूर्ण केलं.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की...
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, 'आम्ही ड्रेसिंग रूममध्ये असे वातावरण टिकवून ठेवण्याचा निश्चय केला होता, जिथे कोणीही घाबरत नाही आणि प्रत्येकजण विश्वास ठेवत राहतो. कधीकधी गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतात, तर कधीकधी त्या तुमच्या हातून निसटतात. तुम्हाला स्थिर आणि एकाग्र राहावे लागते, आणि जर गोष्टी तुमच्या हातातून निसटत असतील, तर त्या परत कशा आणायच्या याचा मार्ग तुम्हाला शोधावा लागतो. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही एकजूट राहता. मला वाटते की या संघाने ते खूप चांगल्या प्रकारे केले. प्रत्येकाने दबावाखाली आपली भूमिका पार पाडली आणि संपूर्ण सामन्यात आम्हाला काही उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली. अब्बास उत्कृष्ट होता आणि रिझवानचे यष्टीरक्षण अपवादात्मक होते.' बाबर आझम पुढे म्हणाला की, 'पहिल्या डावात केलेल्या कामगिरीमुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला. तो डाव आमच्यासाठी विशेष महत्त्वाचा होता. आम्ही आमची गुणवत्ता दाखवली आणि नंतर त्याच कामगिरीवर पुढे वाटचाल केली. मला वाटते की या कसोटी सामन्यात आमच्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण योगदान होते.'
आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि नेपाळ आमनेसामने आले आहे. साखळी फेरीत भारताचा पहिलाच सामना असून विजयी सलामी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. 50 ...
A look at the latest #WTC27 table following Pakistan’s series win over Sri Lanka in Rawalpindi 👀
Try out the standings predictor to see where your favourite team could finish ➡️ https://t.co/T8iyDajWzL https://t.co/eKl2wJLgzd — ICC (@ICC) November 20, 2026
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 गुणतालिकेत काय घडलं?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 च्या अंतिम फेरीत खेळण्याची पाकिस्तान आणि श्रीलंकेची आशा संपुष्टात आली आहे. कारण दोन्ही संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे या सामन्यातील जयपराजयाचा काहीही फरक पडलेला नाही. श्रीलंकेचा संघ आठव्या, तर पाकिस्तानचा संघ नवव्या स्थानावर आहे. श्रीलंकेने आठ कसोटी सामन्यांपैकी फक्त एकच विजय मिळवता आहे. श्रीलंकेचा तीन सामन्यात पराभव आणि चार सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे विजयी टक्केवारी 13.54 इतकी खाली घसरली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा या चक्रातील हा तिसरा विजय असला तरी, त्यांनी 11 पैकी तब्बल सात सामने गमावले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे पाकिस्तानची विजयी टक्केवारी 12.12 टक्के आहे. दरम्यान, या स्पर्धेच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेने आपले अव्वल स्थान कायम आहे. न्यूझीलंड दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे.





