Rising Stars Asia Cup: वनडे फॉरमेटच्या पहिल्याच परीक्षेत अभिषेक शर्मा नापास; अवघ्या 13 चेंडूंतच डाव आटोपला!
रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अभिषेक शर्मा फेल गेला. खरं तर वनडे फॉरमेटमध्ये संघात बसतो की नाही याची एक चाचपणी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. मात्र नेपाळसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध स्वस्तात बाद झाला.
November 20, 2026 06:09 PM
Rising Stars Asia Cup: वनडे फॉरमेटच्या पहिल्याच परीक्षेत अभिषेक शर्मा नापास; अवघ्या 13 चेंडूंतच डाव आटोपला! (Photo: ANI)
अभिषेक शर्मा टी20 फॉरमेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. हे त्याने आपल्या फलंदाजीने सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळे वनडे संघातही असावा अशी मागणी क्रीडाप्रेमी करत आहेत. मात्र 50 षटकांच्या खेळात त्याची छाप काही पडलेली नाही. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. अशा स्थितीत त्याची चाचपणी होणं गरजेचं आहे. जर या फॉर्मेटमध्ये अभिषेक शर्मा चालला तर भारताला जेतेपदाचं स्वप्न गाठणं थोडं सोपं जाईल. अभिषेक शर्माचा गुरू युवराज सिंगही त्याला वनडे संघात सहभागी करण्याबाबत बोलला आहे. असं असताना रायझिंग स्टार्स आशिया कप त्याच्यासाठी एक संधी आहे. पण मिळालेल्या संधीच्या पहिल्याच सामन्यात अभिषेक शर्मा फेल गेला आहे. नेपाळविरुद्धच्या सामन्यात 13 चेंडूंचा सामना केला आणि दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. सामन्याच्या सहाव्या षटकात तंबूत परतला.
अभिषेक शर्माचा खेळ 9 धावांवर आटोपला
नेपाळने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताकडून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ही स्फोटक सलामी जोडी मैदानात उतरली होती. समोर दुबळा नेपाळ संघ असल्याने आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. दोघंही फेल गेले. अभिषेक शर्माने त्याच्या शैलीला साजेशी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू काही पट्ट्यात बसला नाही. या प्रयत्नात त्याने फक्त एक षटकार मारला. त्यानंतर त्याला खेळ काही पुढे जाऊ शकला नाही. या डावाच्या सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माने लेग साईडला उंच फटका मारला. पण सीमेपार चेंडू पाठवण्यात अपयशी आणि झेल बाद झाला. अभिषेक शर्माने 13 चेंडूत फक्त 9 धावा केल्या आणि तंबूत परतला.
आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि नेपाळ आमनेसामने आले आहे. साखळी फेरीत भारताचा पहिलाच सामना असून विजयी सलामी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. 50 ...
आयुष बडोनीही स्वस्तात बाद
अभिषेक शर्मानंतर फलंदाजीची संधी आक्रमक फलंदाज आयुष बडोनीला मिळाली. मात्र त्याचा खेळही फार काळ टिकला नाही. अवघ्या दोन धावांवर असताना ललित राजबंशीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. राजबंशीच्या फ्लाइटेड चेंडूवर बदोनीने क्रीजच्या बाहेर येत कव्हर्सच्या वरून फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू पडल्यानंतर बाहेर गेला आणि बडोनी फसला. यात विकेटकीपर चूक न करता चेंडू पकडला आणि त्याला यष्टीचीत केलं.