IBPS Mains Result 2026 : IBPS PO मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; 7,565 पदांसाठी भरती, पात्र उमेदवारांना मुलाखतीची संधी

परीक्षेला बसलेले उमेदवार आता IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल तपासू शकतात.

Education News: बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) मुख्य परीक्षेचा निकाल 20 नोव्हेंबर 2026 रोजी जाहीर केला आहे. 4 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा झाली होती. परीक्षेला बसलेले उमेदवार आता IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल तपासू शकतात.



7,565 पदांसाठी भरती प्रक्रिया


IBPS PO/MT-XVI भरती प्रक्रियेद्वारे सहभागी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनीची एकूण 7,565 पदे भरली जाणार आहेत. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात म्हणजेच मुलाखतीसाठी संधी मिळणार आहे. मुलाखतीसंदर्भातील वेळापत्रक आणि पुढील सूचना IBPS कडून अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जातील.



असा तपासा निकाल


उमेदवारांना पुढील सोप्या पद्धतीने निकाल पाहता येईल.




  1. सर्वप्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  2. होमपेजवरील CRP PO/MT विभाग निवडा.

  3. IBPS PO Mains Result 2026 या लिंकवर क्लिक करा.

  4. नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड अथवा जन्मतारीख टाका.

  5. लॉगिन केल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल.

  6. भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करून त्याची प्रत जतन करा.


मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. मुलाखतीची तारीख, प्रवेशपत्र आणि कागदपत्र पडताळणीसंदर्भातील माहितीसाठी IBPS च्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे.


Comments
Add Comment

PM Modi Bihar Visit : PM मोदींचा वैशाली दौरा! बिहारला मिळणार ३४,४७० कोटींच्या प्रकल्पांची मोठी भेट!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, शनिवार (२१ नोव्हेंबर) रोजी बिहारच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर जात आहेत.

Unique Temples In India : देवाला वाहिली जाते दारू, पेटती सिगारेट आणि खेळण्यातली विमाने! भारतातील या अनोख्या मंदिरांमधील विचित्र प्रथा वाचून व्हाल थक्क

नवी दिल्ली : आपल्या देशात मंदिरात गेल्यानंतर देवाच्या चरणी फुले, नारळ, पेढे आणि अगरबत्ती वाहणे ही अगदी नेहमीची

Yogi Adityanath News : योगी आदित्यनाथ यांच्यावर दुःखाचा डोंगर; मातोश्री सावित्री देवी यांचे निधन, कंगना रणौतची भावूक पोस्ट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री सावित्री

Assam Elephant Calf : आईने नाकारले, पण 'वनतारा'ने स्वीकारले; आसाममधील जखमी हत्तीच्या पिल्लाला विशेष विमानाने गुजरातला आणणार

जामनगर : जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच स्वतःच्या आईकडून नाकारल्या गेलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या एका दोन

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मातृशोक, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे शुक्रवारी उत्तराखंड

OM movie advance booking : प्रदर्शनापूर्वीच धनुषच्या 'ओएम'चा बॉक्स ऑफिसवर धमाका; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 'रायन'चा विक्रम मोडला

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा बहुप्रतिक्षित ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'ओएम : चॅप्टर १ - उधिरम' (OM: Chapter 1 - Udhiram)