उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मातृशोक, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी निधन झाले. पौरी गढवालचे एसएसपी सर्वेश पनवार यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे शुक्रवारी उत्तराखंड राज्यातील पौरी गढवाल जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी निधन झाले. पौरी गढवालचे एसएसपी सर्वेश पनवार यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एसएसपी सर्वेश पनवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पौरी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात सावित्री देवी यांचे निधन झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्रींवर शनिवारी हरिद्वारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन योगी यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. त्यांच्यासोबत संवाद साधून सविस्तर माहिती माध्यमांना देण्यात येणार आहे."






मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्रींचे निधन वयाच्या 91 व्या वर्षी झाले आहे. त्या गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या आणि शुक्रवारी त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी 'एक्स'वर पोस्ट शेअर करत सावित्री देवी श्रद्धांजली वाहिली आहे आणि योगी आदित्यनाथ यांच्या दु:खामध्ये सामील असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पोस्ट शेअर करत माहिती दिली की, "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. आईचे प्रेम, आशीर्वाद आणि माया ही जीवनातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. त्यांच्या निधनामुळे योगी यांच्या कुटुंबीयांमध्ये निर्माण झालेली पोकळी केव्हाही भरून न निघणारी आहे. मी बाबा केदार यांच्याकडे प्रार्थना करतो की, त्यांच्या आत्म्याला त्यांच्या पवित्र चरणी स्थान द्यावे. योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्हीही सहभागी आहोत."


 


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. आई गमावण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करता येत नाही. आयुष्यात आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. या कठीण काळात मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत."




Comments
Add Comment

OM movie advance booking : प्रदर्शनापूर्वीच धनुषच्या 'ओएम'चा बॉक्स ऑफिसवर धमाका; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 'रायन'चा विक्रम मोडला

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा बहुप्रतिक्षित ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'ओएम : चॅप्टर १ - उधिरम' (OM: Chapter 1 - Udhiram)

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाकडून जोरदार तयारी; सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, सोशल मिडिया इन्फ्लुएंसर्स अन्...

उत्तर प्रदेश: मथुरेमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दोन दिवसीय बैठकीनंतर, पक्षाने उत्तर प्रदेश

मुंबई- वाराणसी फक्त 16 तासांत? मार्गावर ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन सुरू करण्याची मागणी

मुंबई: देशामध्ये ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत आहे. ‘वंदे भारत’च्या दमदार

आजपासून बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर हाय- व्होल्टेज वीजपुरवठा सुरू होणार, पण ट्रेन केव्हापासून धावणार?

मुंबई: भारत देश वाहतूक क्षेत्रात नवा इतिहास रचण्याची तयारी वेगाने सुरू करत आहे. 2027 मध्ये मुंबई- अहमदाबाद हाय- स्पीड

Weather Alert: देशाच्या हवामानात मोठा बदल! ओडिशात ३ लाख नागरिकांचे स्थलांतर, अनेक राज्यांना पावसाचा इशारा

देशाच्या पूर्व किनारपट्टीवर 'अक्वान' चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले असून, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये

गँगस्टर नसीम दुर्रानीचा गोळ्या झाडून खात्मा, नोएडा एसटीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली संयुक्त कारवाई

नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर नसीम दुर्रानी याची गोळ्या झाडून त्याला ठार मारण्यात आले आहे. नोएडा एसटीएफ आणि दिल्ली