Nashik Crime : चारित्र्यावर संशय, सततचा छळ अन् अखेर भयानक शेवट, नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

आकाश हा पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. या वादातून तो पूजाला मारहाणही करत असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक : नाशिकच्या पंचवटी परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने मोबाईलवरून झालेल्या वादानंतर तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. ही घटना गुरुवारी (दि. १९) पेठरोडवर आरटीओ ऑफिससमोर सप्तरंग सोसायटीमागे कोमल सोसायटीत घडली. पूजा यादव (वय ३०) असं मृत विवाहितेचं नाव असून, रिक्षाचालक आकाश सुरेश जाधव (३०) असं आरोपी पतीचं नाव आहे. या घटनेनंतर म्हसरूळ पोलिसांनी (Mhasrul Police Station)  आरोपीला अटक केली आहे.



चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून छळ


मिळालेल्या माहितीनुसार, आरटीओ परिसरातील कोमल सोसायटीत राहणाऱ्या आकाश जाधव याचा ११ वर्षापूर्वी बिहार राज्यातील पूजा यादव हिच्याशी विवाह झाला होता. हे दाम्पत्य पंचवटी परिसरात राहत होते. आकाश हा पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. या वादातून तो पूजाला मारहाणही करत असल्याची माहिती समोर आली आहे. पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पूजाने पंधरा दिवसांपूर्वी आकाशला घरात कोंडून ठेवल्याचेही तपासात समोर आले आहे.






मोबाईलवरून वाद, अन् पत्नीची हत्या


घटनेच्या दिवशी आकाशने पूजाकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र, तिने मोबाईल देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद पुढे वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याचदरम्यान संतापलेल्या आकाशने पूजाच्या ओढणीने तिचा गळा आवळला. गळा आवळल्याने पूजाचा मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला. याप्रकरणी आकाश जाधव याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास म्हसरूळ पोलीस (Mhasrul Police Station)  करत आहेत.



दोघेही मूळ बिहारचे


घटनेतील संशयित आरोपी आकाश मूळ बिहार राज्यातील असून त्याचे वडील महाराष्ट्रात स्थायिक झाल्याने नाशिकमध्ये जन्मलेला आकाश नाशिकमध्येच राहत होता त्याच्या वडिलांनी पूजासोबत लग्न लावून दिलं होतं. आकाशचे आडनाव देखील यादव असून तो महाराष्ट्रातच वास्तव्यास असल्याने त्याचे आडनाव दुरुस्ती करत यादव ऐवजी जाधव असे केले होते.

Comments
Add Comment

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात सलग आठव्या दिवशी घसरण, आठ दिवसांत सोनं 12,400 रुपयांनी स्वस्त, पाहा आजचे दर

Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या बाजारात घसरणीचे सत्र सुरूच आहे. एकीकडे सोन्याने काही

Public Private Partnership: महापालिकेच्या नवीन रुग्णालयांमध्ये पीपीपी अंतर्गत् चांगल्याप्रकारे मिळणार सुविधा

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात चांगली सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

Nashik : नाशिकमध्ये निवृत्त RTO अधिकाऱ्याची आत्महत्या, राहत्या घरात स्वतःवर झाडली गोळी

नाशिक : नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत गोविंद

Firecracker Ban: मुंबईत रॉकेट आणि आकाशात उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांवर बंदी; महापालिका प्रशासनाने दिले आदेश

मुंबई (विशेष् प्रतिनिधी): मुंबई महापालिका सभागृहात पुन्हा एकदा दिया मिर्झा यांच्या नावाचे फटाके फोडण्याच्या

महापालिकेच्या केईएम व नायर रुग्णालयात एमआरआय सुविधा , महापौर रितू तावडे यांच्‍या हस्‍ते झाले लोकार्पण

 मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई सेंट्रल येथील बाई यमुनाबाई लक्ष्‍मण नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला

हरिमौ शक्ती-6 चा धमाका! मलेशियात भारत-मलेशिया सैन्याचा महासराव सुरू; रणनीती नेमकी काय?

नवी दिल्ली : भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक बळकट करणारा ‘हरिमौ शक्ती-6’ हा संयुक्त