Nashik : नाशिकमध्ये निवृत्त RTO अधिकाऱ्याची आत्महत्या, राहत्या घरात स्वतःवर झाडली गोळी

नाशिक : नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सिटी सेंटर मॉल परिसरातील त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. या प्रकारामुळे शहरातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत हेमाडे हे सिटी सेंटर मॉल परिसरात वास्तव्यास होते. राहत्या घरातच त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.






आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट


दरम्यान, हेमाडे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक स्तरावर कौटुंबिक कारणातून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. घटनास्थळी सुसाईड नोट किंवा अन्य काही पुरावे आढळले आहेत का, याबाबतही अद्याप माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून सर्व शक्यता पडताळून तपास सुरू आहे. दरम्यान, एका निवृत्त परिवहन अधिकाऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेने नाशिकमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Comments
Add Comment

Firecracker Ban: मुंबईत रॉकेट आणि आकाशात उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांवर बंदी; महापालिका प्रशासनाने दिले आदेश

मुंबई (विशेष् प्रतिनिधी): मुंबई महापालिका सभागृहात पुन्हा एकदा दिया मिर्झा यांच्या नावाचे फटाके फोडण्याच्या

महापालिकेच्या केईएम व नायर रुग्णालयात एमआरआय सुविधा , महापौर रितू तावडे यांच्‍या हस्‍ते झाले लोकार्पण

 मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई सेंट्रल येथील बाई यमुनाबाई लक्ष्‍मण नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला

हरिमौ शक्ती-6 चा धमाका! मलेशियात भारत-मलेशिया सैन्याचा महासराव सुरू; रणनीती नेमकी काय?

नवी दिल्ली : भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक बळकट करणारा ‘हरिमौ शक्ती-6’ हा संयुक्त

अ‍ॅमस्टरडॅमच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अ‍ॅमस्टरडॅम नगरीच्‍या महापौर फेम्के हलसेमा यांनी आज,

Pavana Dam: पवना धरणग्रस्तांना संपादित क्षेत्राइतकी पर्यायी जमीन; कमाल मर्यादा 4 एकर

Pavana Dam: गेल्या सहा दशकांपासून प्रलंबित असलेल्या पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी

भांडुप संकुलातील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कामाला गती; अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईची दीर्घकालीन जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने भांडुप नवीन जलशुद्धीकरण