
मुंबई: नितेश तिवारी दिग्दर्शित, 'रामायण' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. 5 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपट रिलीज झाला असून चित्रपट रिलीज होऊन 15 दिवस झाले आहेत. चित्रपटाने 15 दिवसांत 1500 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून दररोज वेगवेगळे रेकॉर्ड बनवताना दिसत आहे. देशासह परदेशामध्येही चित्रपट दमदार कमाई करताना दिसत आहे. 4000 कोटींमध्ये निर्मिती झालेल्या ह्या चित्रपटाने अर्धा बजेट वसूल सुद्धा केला आहे. चित्रपटाने 15 दिवसांमध्ये 1547 कोटींची कमाई केली आहे, चित्रपटाच्या एकंदरित कमाईबद्दल जाणून घेऊया...
रणबीर कपूर आणि साई पल्लवी अभिनित, 'रामायण' चित्रपटाने 15 दिवसांमध्ये देशासह परदेशामध्ये जबरदस्त कमाई केलेली पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे तर, चित्रपटाने देशामध्ये, 864 कोटींहून अधिकची कमाई केलेली आहे. तर, जगभरात 1,547 कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची घोडदौड अद्याप सुरूच असल्याचं दिसत आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा पाहता पुढील आणखीन काही दिवस चित्रपटाची ही यशस्वी घोडदौड बॉक्स ऑफिसवर कायम पाहायला मिळणार आहे. गुरुवारच्या दिवशी, 'रामायण'चित्रपटाने भारतामध्ये बॉक्स ऑफिसवर एकाच दिवसात 19 कोटींची कमाई केली आहे आणि जगभरात ह्या चित्रपटाने 'धुरंदर 2' चा रेकॉर्ड मोडण्याच्या आणखी जवळ पोहोचला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. प्रियंका सोशल मीडियावर नेहमीच आपल्या कुटुंबातील खास ...
रणबीर कपूरच्या 'रामायण'चित्रपटाने, पहिल्याच आठवड्यात 155 कोटी डॉलर्सची कमाई केली होती, एका आठवड्यातच जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 10 अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. आता, अवघ्या 15 दिवसांत या चित्रपटाने 15 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर कपूर आणि साई पल्लवी अभिनित, 'रामायण' चित्रपटाने गुरुवारी एकाच दिवसात जगभरातील बॉक्स ऑफिसवर अंदाजे 28.10 कोटी डॉलर्सची कमाई केली आहे. 'रामायण'चित्रपटाने 15 दिवसांत 1547.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' चा लाईफटाईम रेकॉर्ड मोडण्यासाठी आता या चित्रपटाला आणखी 305 कोटी रुपये कमवावे लागतील. चित्रपटाच्या कमाईची स्पीड पाहता अवघ्या काही दिवसांतच सहज हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये बाजी मारेल.
नितेश तिवारींच्या 'रामायण' या पौराणिक चित्रपटाला जितके प्रेम भारतात प्रेम मिळत आहे, तेवढेच प्रेम परदेशातही मिळत आहे. 'दंगल'नंतर, यश आणि रणबीरचा 'रामायण' हा परदेशी बाजारपेठेत दुसरा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरेल. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 833.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे , तर परदेशात तब्बल 515 कोटी रुपयांची कमाई केली आहे. उत्तर अमेरिका आणि कॅनडामध्ये मिळून चित्रपटाने 235 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली, तर आखाती देशांमधून सुमारे 50.76 कोटी रुपये कमावले. चित्रपटाने ऑस्ट्रेलियामध्ये 39.48 कोटी रुपये आणि यूकेमधून सुमारे 50.76 कोटी रुपये कमावले. थायलंड, नेपाळ आणि मलेशियामध्येही चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.





