Prahaar Marathi News Live Updates: कुख्यात गँगस्टर नसीम दुर्रानीची गोळ्या झाडून हत्या
कुख्यात गँगस्टर नसीम दुर्रानी याची गोळ्या झाडून त्याला ठार मारण्यात आले आहे. नोएडा एसटीएफ आणि दिल्ली पोलीस यांनी संयुक्त रित्या ही मोहिम फत्ते केली आहे. उत्तर प्रदेशातील बुंदलशहरामध्ये ही मोहिम राबवण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या गँगमधील हा सदस्य होता. नोएडा एसटीएफ आणि दिल्ली पोलीस यांच्या संयुक्त कारवाईमध्ये नसीमचा खात्मा करण्यात आला आहे.