मुंबई- वाराणसी फक्त 16 तासांत? मार्गावर ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन सुरू करण्याची मागणी

मुंबई ते वाराणसीदरम्यान ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन सुरू झाल्यास सध्याचा 25 ते 30 तासांचा प्रवास थेट 16 ते 18 तासांवर येऊ शकतो. या वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेससाठी अद्याप रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिलेली नाही.

मुंबई: देशामध्ये ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत आहे. ‘वंदे भारत’च्या दमदार प्रतिसादानंतर रेल्वेने ‘वंदे भारत स्लीपर’ एक्स्प्रेस सुद्धा चालवण्यात येत आहे. हावडा– कामाख्या (गुवाहाटी), वाराणसी– नई दिल्ली आणि बेंगलुरु– मुंबई या तीन मार्गांनंतर आता आणखी एका मार्गावर ‘वंदे भारत स्लीपर’ चालवण्याच्या तयारीत आहे. मुंबई ते वाराणसी मार्गावर ‘वंदे भारत स्लीपर’ चालवण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. 25 ते 30 तासांच्या प्रवासासाठी 16 ते 18 तासांवर आणण्याच्या दृष्टीने ‘वंदे भारत स्लीपर’ सुरू करण्याची मागणी केली जात आहे.


मुंबई आणि वाराणसीदरम्यान जर सुरू करण्यात आली तर, ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमुळे प्रवाशांचा तब्बल 8 ते 12 तासांचा वेळ वाचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाराणसीतील पिंडरा मतदारसंघाचे आमदार अवधेश सिंह यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मुंबई आणि वाराणसीदरम्यान थेट ‘वंदे भारत स्लीपर’ सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. वाराणसी- नवी दिल्ली वंदे भारत स्लीपर सेवेच्या उद्घाटनादरम्यान त्यांनी ही मागणी केली होती. मुंबईत वाराणसी, जौनपूर आणि भदोही परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास असून नोकरी- व्यवसायानिमित्त त्यांचे या दोन भागांमध्ये सातत्याने येणे- जाणे सुरू असते, याचदृष्टीने त्यांनी ही मागणी केली आहे.






प्रवाशांच्या सोयीचा विचार करून मुंबई- वाराणसी ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन सुरू करण्याची विनंती रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे अवधेश सिंह यांनी सांगितले. याआधीही अनेक गाड्या सुरू करण्यात आल्या असून भविष्यात आणखी सेवांवर विचार केला जाईल, असे आश्वासन रेल्वे अधिकार्‍यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, या भागातील प्रवाशांच्या गरजा आणि सूचना रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अद्याप, मुंबई- वाराणसी वंदे भारत स्लीपरला रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत मंजुरी मिळालेली नाही. ट्रेनविषयी कोणतीही सविस्तर माहिती अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. जर मुंबई- वाराणसी ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन जर सुरू झाली तर, उत्तर भारतीय प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.


सध्या मुंबईहून वाराणसीकडे जाण्यासाठी अनेक थेट रेल्वे गाड्या उपलब्ध असल्या, तरी बहुतांश गाड्यांना एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागतो. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते जयनगर दरम्यान धावणारी 11061 पवन एक्सप्रेस ही तुलनेने वेगवान गाडी मानली जाते; ह्या एक्सप्रेसला वाराणसी जंक्शनला पोहोचण्यासाठी तब्बल 24 तास 55 मिनिटांचा वेळ लागतो. याशिवाय एलटीटी- बनारस सुपरफास्ट एक्सप्रेस (12167) ला अंदाजे 26 तास 40 मिनिटांचा अवधी लागतो. तर, महानगरी सुपरफास्ट एक्सप्रेसला (22177) सुमारे 27 तास 30 मिनिटे, तर काशी एक्सप्रेसला (15017) तब्बल 30 तास 25 मिनिटे लागतात. योग्य वेग आणि कमी थांबे ठेवल्यास ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमुळे हा प्रवास 16 ते 18 तासांवर येऊ शकतो. मात्र, हा केवळ प्राथमिक अंदाज असून अंतिम मार्ग, वेळापत्रक, पायाभूत सुविधा, तांत्रिक आणि परिचालन मंजुरीवरच तो अवलंबून असेल.






सध्या रेल्वे मंत्रालयाने या प्रस्तावित सेवेला मंजुरी दिलेली नाही किंवा सुरू करण्याची कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही. हावडा-गुवाहाटी, वाराणसी-नवी दिल्ली आणि मुंबई-बंगळुरू या मार्गांनंतर मुंबई-वाराणसी ही देशातील चौथी वंदे भारत स्लीपर ट्रेन ठरू शकेल.

Comments
Add Comment

आजपासून बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर हाय- व्होल्टेज वीजपुरवठा सुरू होणार, पण ट्रेन केव्हापासून धावणार?

मुंबई: भारत देश वाहतूक क्षेत्रात नवा इतिहास रचण्याची तयारी वेगाने सुरू करत आहे. 2027 मध्ये मुंबई- अहमदाबाद हाय- स्पीड

Weather Alert: देशाच्या हवामानात मोठा बदल! ओडिशात ३ लाख नागरिकांचे स्थलांतर, अनेक राज्यांना पावसाचा इशारा

देशाच्या पूर्व किनारपट्टीवर 'अक्वान' चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले असून, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये

गँगस्टर नसीम दुर्रानीचा गोळ्या झाडून खात्मा, नोएडा एसटीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली संयुक्त कारवाई

नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर नसीम दुर्रानी याची गोळ्या झाडून त्याला ठार मारण्यात आले आहे. नोएडा एसटीएफ आणि दिल्ली

हरिमौ शक्ती-6 चा धमाका! मलेशियात भारत-मलेशिया सैन्याचा महासराव सुरू; रणनीती नेमकी काय?

नवी दिल्ली : भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक बळकट करणारा ‘हरिमौ शक्ती-6’ हा संयुक्त

2070 पर्यंत भारतातील मुस्लिम लोकसंख्या किती वाढणार; प्यू रिसर्चचा अंदाज काय सांगतो?

नवी दिल्ली : भारतासह जगभरातील धार्मिक लोकसंख्येच्या रचनेत आगामी दशकांमध्ये बदल होण्याचा अंदाज एका चर्चित

दिल्ली विमानतळावर सुरक्षा भेदून आत घुसण्याचा प्रयत्न! CISF जवानांनी काही सेकंदांत पकडला तरुण

नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-3 येथे सुरक्षा यंत्रणेला चकमा देत