नवी दिल्ली: कुख्यात गँगस्टर नसीम दुर्रानी याची गोळ्या झाडून त्याला ठार मारण्यात आले आहे. नोएडा एसटीएफ आणि दिल्ली पोलीस यांनी संयुक्त रित्या ही मोहिम फत्ते केली आहे. उत्तर प्रदेशातील बुंदलशहरामध्ये ही मोहिम राबवण्यामध्ये पोलिसांना यश आले आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या गँगमधील हा सदस्य होता. नोएडा एसटीएफ आणि दिल्ली पोलीस यांच्या संयुक्त कारवाईमध्ये नसीमचा खात्मा करण्यात आला आहे. 15 ते 20 गोळ्या झाडून निघृणहत्या करण्यात आल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशामध्ये नसीमला गोळ्या झाडून ठार मारण्यात आल्याचे वृत्त 'आज तक' या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. गँगस्टरची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर सर्वच स्तरातून दिल्ली पोलिसांचे आणि नोएडा एसटीएफ पथकाचे कौतुक केले जात आहे.
हरिमौ शक्ती-6 चा धमाका! मलेशियात भारत-मलेशिया सैन्याचा महासराव सुरू; रणनीती नेमकी काय?
नवी दिल्ली : भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक बळकट करणारा ‘हरिमौ शक्ती-6’ हा संयुक्त लष्करी सराव मलेशियातील इपोह येथे सुरू ...
नोएडा एसटीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामध्ये 16 नोव्हेंबरच्या दिवशी मोठी मोहीम राबवत नसीम दुर्रानीचा खात्मा करण्यात आला आहे. कुख्यात गुंड नसीम दुर्रानी हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या संपर्कामध्ये होता. मिळालेल्या माहितीनुसार, 2016- 17 दरम्यान, शकीलने तिहार तुरूंगात कैद असलेल्या छोटा राजनच्या हत्येसाठी नसीम दुर्रानीला सुपारी देण्यात आली होती. दिल्लीतील एका खून प्रकरणात नसीम दुर्रानी प्रमुख आरोपी होता, गेल्या अनेक दिवसांपासून तो दिल्ली पोलिसांच्या रडारावर होता. अखेर नसीम दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर थेट त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बुलंदशहरमध्ये नसीम आणि पोलीस पथकामध्ये अनेकदा गोळीबार झाला. या चकमकीत नसीम दुर्रानीला 15 ते 20 गोळ्या लागल्या, या चकमकीमध्ये तो गंभीर जखमी होता.
2070 पर्यंत भारतातील मुस्लिम लोकसंख्या किती वाढणार; प्यू रिसर्चचा अंदाज काय सांगतो?
नवी दिल्ली : भारतासह जगभरातील धार्मिक लोकसंख्येच्या रचनेत आगामी दशकांमध्ये बदल होण्याचा अंदाज एका चर्चित लोकसंख्याविषयक अभ्यासातून व्यक्त करण्यात ...
गोळीबारामध्ये नसीम दुर्रानी गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला नोएडा एसटीएफ आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने रुग्णालयामध्ये नेले. पण रुग्णालयामध्ये नेण्याच्या आधीच त्याचे निधन झाले होते. डॉक्टरांनी त्याची तपासणी करत मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबर रोजी नसीम दुर्रानीने दिल्ली सरकारचे मंत्री कपिल मिश्रा यांच्या कार्यालयाबाहेर समीर नावाच्या व्यक्तीची 15 ते 20 गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या केली. नसीमवर खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोडा यांसारखे 25 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याशिवाय, नसीम दुर्रानीवर पाकिस्तानी वंशाच्या तारिक फतेह यांच्या हत्येचा कट रचल्याचाही आरोप होता. यासर्व आरोपांखालीच नसीमला गोळ्या झाडून ठार मारण्यात आले.