
नाशिक : अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागाने शहरातील चार हॉटेलचे परवाने आणि एका कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले आहे. २० नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सह आयुक्त मंगेश माने, सहायक आयुक्त (अन्न) विनोद धवड आणि ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
तपासणीदरम्यान अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, मुदतबाह्य पदार्थ, कच्च्या मालाची अस्वच्छ साठवणूक, स्वयंपाकघराच्या रचनेतील त्रुटी, उंदरांची विष्ठा तसेच कीटकांचा प्रादुर्भाव आढळून आला. काही ठिकाणी अन्न सुरक्षा व मानके नियम, २०११ मधील अनुसूची चारचे उल्लंघन झाले होते. कॅफे दुर्ग येथे ग्राहकांच्या बिलावर एफएसएसएआय परवाना क्रमांक नसणे आणि स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या माध्यमाचा उल्लेख मेन्यू कार्डवर नसणे, या त्रुटीही आढळल्या.
नाशिक : सोशल मीडियावर आकर्षक ड्रेसची रील पाहून ऑनलाइन खरेदी करणे सिडको परिसरातील एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. ड्रेस ऑर्डर करण्याच्या ...
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील, ऋतुजा नवले, प्रतीक भंड, किशोर चांदगुडे आणि संकेत येलमामे यांनी केली.नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन अशा आस्थापनांची तपासणी व नियमानुसार कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि त्याअंतर्गत नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा सुरक्षिततेबाबत संशय असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही प्रशासनाने कळविले आहे.
कारवाई करण्यात आलेली आस्थापने :
1. मे. हॉटेल विहार, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड.
2. मे. हॉटेल श्यामसुंदर, सी रोड, एमआयडीसी, सातपूर.
3. मे. हॉटेल तुषार मिसळ, असावरी चेंबर्ससमोर, मलेरिया टॉप, कॉलेज रोड.
4. मे. हॉटेल महाराजा काठियावाडी, आडगाव फाटा, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी.
5. मे. कॅफे दुर्ग कॅफे, युबॉइड बिझनेस सेंटर, कृषीनगर, कॉलेज रोड (नोंदणी प्रमाणपत्र निलंबित)





