
संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सह-मालकीण काव्या मारन यांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा (Aniruddha and Kavya Wedding Reception) चेन्नईत मोठ्या थाटात पार पडला. या जोडप्याने ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये अगदी साध्या आणि खासगी पद्धतीने लग्न केलं होतं. त्यानंतर आज चेन्नईतील आयटीसी ग्रँड चोला हॉटेलमध्ये त्यांचं भव्य रिसेप्शन आयोजित करण्यात आलं.या रिसेप्शनला चित्रपटसृष्टी आणि क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. रजनीकांत, महेश बाबू आणि विजय यांच्यासह अनेक बड्या कलाकारांची उपस्थिती यावेळी होती.
रिसेप्शनसाठी अनिरुद्ध आणि काव्या यांनी रॉयल लूक निवडला होता. काव्याने लाल रंगाचा फ्लोरल लेसचा टू-पीस ड्रेस घातला होता. तर अनिरुद्धने डीप मरून रंगाचं भरजरी काम केलेलं जॅकेट आणि काळी पँट घातली होती. काळा आणि लाल या कॉम्बिनेशनमध्ये हे जोडपं अतिशय सुंदर दिसत होतं. अनिरुद्ध आणि काव्याने ११ नोव्हेंबरला ग्रीसमध्ये अनोख्या पद्धतीने लग्न केलं. त्यांनी 'सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज' म्हणजेच स्वाभिमानी विवाह पद्धतीने लग्न केलं. याबाबत डीएमके आयटी विंगचे सचिव डॉ. टी. आर. बी. राजा यांनी माहिती दिली. सेल्फ रिस्पेक्ट मॅरेजची सुरुवात तामिळनाडूमध्ये समाजसुधारक पेरियार ई. व्ही. रामासामी यांनी केली होती. या पद्धतीत वधू-वर साक्षीदारांसमोर एकत्र राहण्याचं वचन देतात आणि हार किंवा अंगठीची देवाणघेवाण करतात. यात कोणतेही धार्मिक विधी नसतात. समान हक्क आणि एकमेकांबद्दल आदर यावर आधारित साध्या पद्धतीने लग्न करण्याचं स्वातंत्र्य ही पद्धत देते. तामिळनाडूमध्ये १९६७ मध्ये या विवाह पद्धतीला कायदेशीर मान्यता मिळाली.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता धनुष आणि अभिनेत्री साई पल्लवी यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. ‘मारी 2’ या ...
अनिरुद्धने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिलं होतं, "My once in a lifetime, for a lifetime 11.11". लग्नासाठी अनिरुद्धने आयव्हरी रंगाचा क्लासिक लूक ठेवला होता. त्याने कुर्ता आणि भरजरी काम असलेलं लांब जॅकेट घातलं होतं.काव्याने यावेळी ब्लश-पिंक रंगाचा भरजरी लेहेंगा घातला होता. त्यावर सिक्विन वर्क होतं. मॅचिंग ब्लाऊजसोबत तिने स्टेटमेंट चोकर आणि कानातले घातले होते. पेस्टल रंगाच्या कपड्यांमध्ये हे जोडपं खूपच सुंदर दिसत होतं. ग्रीसमधील साध्या लग्नानंतर चेन्नईतील या भव्य रिसेप्शनने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर या जोडप्याच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





