
Avinash Isha Breakup Rumours: बिग बॉस 18च्या घरात टीव्ही अभिनेता अविनाश मिश्रा आणि अभिनेत्री ईशा सिंग दोघांना लोकप्रियता मिळाली. सध्या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती. मात्र, त्यानंतर लगेचच दोघांमध्ये दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या. सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यापासून ते ईशाच्या आईच्या कथित व्हॉइस नोटपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा रंगली. आता या सर्व चर्चांवर अविनाशने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
प्रत्येकाच्या खासगी आयुष्याचा आदर करा
अविनाशने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले आहे, ‘मित्रांनो, आता या सगळ्या गोष्टी मागे सोडून पुढे जाऊया. मागील काही आठवडे अनेकांसाठी कठीण होते. सर्व मीडिया पेजेसना विनंती आहे की, प्रत्येकाच्या खासगी आयुष्याचा आदर करा. नातेसंबंध हे वैयक्तिक असतात, ते सार्वजनिक मनोरंजनाचा विषय नाहीत. प्रत्येक गोष्ट ही व्ह्यूज आणि एंगेजमेंटसाठी नसते. लोकांना शांततेत जगू द्या.’ अविनाशने त्याच्या या पोस्टमध्ये कुठेही ईशाचे नाव घेतलेले नाही. शिवाय, दोघांचं ब्रेकअप झालं आहे की नाही, याबाबतही कोणतंही स्पष्ट विधान केलेलं नाही. मात्र, त्याच्या या पोस्टमुळे सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचं दिसत आहे.
त्यानंतर आता दोघांनी सोशल मीडियावरील एकत्र फोटो डिलिट केले आहेत. तसेच व्हायरल झालेल्या ईशाच्या आईच्या कथित व्हॉईस नोट दोघांनीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवाय, ब्रेकअपच्या चर्चांवर सार्वजनिक प्रतिक्रिया दोघांपैकी कोणीही दिलेली नाही.
[caption id="attachment_1077497" align="alignnone" width="800"] अभिनेत्री प्राची देसाई एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर सोशल मीडियावर परत आली आहे, तिने आपल्या इंस्टाग्रामवर Proof of existence असं ...
अविनाशने ‘खतरों के खिलाडी 15’ हा शो जिंकल्यानंतर आयोजित केलेल्या पार्टीत ईशाचं कौतुक केलं होतं. यावेळी त्याने ईशाला ‘आय लव्ह यू’ असं म्हटलं होतं. त्यानंतर ‘पती पत्नी और पंगा 2’ च्या सेटवरही दोघांनी आपल्या नात्याबद्दल स्पष्ट संकेत दिले. अविनाशने आपण केवळ चांगले मित्र नसून त्यापेक्षा अधिक असल्याचं सांगितलं होतं. मात्र, या कबुलीनंतर काही दिवसांतच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या.
[caption id="attachment_1077497" align="alignnone" width="800"] अभिनेत्री प्राची देसाई एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर सोशल मीडियावर परत आली आहे, तिने आपल्या इंस्टाग्रामवर Proof of existence असं ...





