मुंबई: ॲप्पल आयफोनची क्रेझ अगदी लहानांपासून मोठ्यापंर्यंत प्रत्येकामध्ये पाहायला मिळते. कोणताही फोन असो, त्याची कितीही किंमत असो, तरीही अनेक युजर्स तो फोन विकत घेतातच. जर तुम्ही आयफोन प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ॲप्पलने आपल्या खास ग्राहकांसाठी पुढच्या वर्षी होणाऱ्या ॲप्पलच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त मोठं गिफ्ट देण्याची योजना आखली आहे. ॲप्पलच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त, कंपनीने आपल्या जगभरातील युजर्ससाठी मोठी घोषणा करण्याची तयारी करत आहे. 2017 मध्ये कंपनीने iphone 8 आणि iphone 8+ सोबत iphone X सुद्धा एकत्र लाँच केला होता. एकाचवेळी तीन फोन लाँच केल्यामुळे जगभरातील चाहत्यांना कंपनीने चकित केले होते. आता इतिहास पुन्हा घडवत कंपनी 20 व्या वर्धापनदिनी iphone 19 सिरीजसोबत iphone 20 सुद्धा बाजारात आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Goldy Brar News: अमेरिका-कॅनडाच्या मोस्ट वॉन्टेड यादीत गोल्डी ब्रार! पकडण्यासाठी 8.5 कोटींचे बक्षीस
Goldy Brar: लॉरेन्स बिश्नोई गँगमधील कुख्यात गुंड गोल्डी ब्रार याला अमेरिकेच्या 10 मोस्ट वॉन्टेड फरार आरोपींच्या स्थान दिले आहे. गोल्डी ब्रारला अटक करण्यास ...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ॲप्पल पुढच्या वर्षी बाजारामध्ये 4 नवीन iphone मॉडेल्स आणण्याच्या तयारीमध्ये आहे. यामध्ये डिझाइनपासून ते अनेक महत्त्वाच्या सुधारणांपर्यंत मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये कर्व्ड स्क्रीन असलेल्या आयफोनचाही समावेश असण्याची शक्यता आहे. 9to5mac ने दिलेल्या वृत्तानुसार, ॲप्पलकडून 2 iphone फ्लॅट स्क्रीनसह तर उर्वरित 2 iphone कर्व्ड स्क्रीनसह बाजारात लाँच केले जाणार आहेत. त्यामुळे वर्धापनदिन विशेष आवृत्तीच्या रूपात कंपनी 4 नवीन मॉडेल्स सादर करू शकते. कंपनी गेल्या 3 वर्षांपासून बॉर्डरलेस डिझाइनवर काम करत असून यामध्ये बेझल्स सुमारे 1 मिमी इतके पातळ असू शकतात. गेल्या वर्षी ॲप्पलने iPhone च्या मागील बाजूच्या पॅनेलमध्ये बदल केला होता. मात्र डिस्प्लेमध्ये फारसे मोठे बदल झाले नव्हते. दुसरीकडे, सॅमसंगने यापूर्वीच कर्व्ड डिस्प्ले असलेले स्मार्टफोन्स सादर केले आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक, कमी व्याजदरावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हची केली कानउघाडणी
मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या कमी व्याजदरांची प्रशंसा केली असून अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेवर टीका केली आहे. ट्रम्प यांनी ...
20 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर ॲप्पलकडून आपल्या जगभरातील ॲप्पल युजर्सला iphone 18 Pro सीरिजनंतर थेट iphone 19 आणि iphone 20 सीरिज लाँच केली जाऊ शकते. 2017 प्रमाणेच iphone 19 सोबत iphone 20 देखील आणू शकते, अशी चर्चा आहे. आइस युनिव्हर्सने दिलेल्या वृत्तानुसार, नव्या आयफोनमध्ये ग्राहकांना स्क्रीनला कर्व्ह ग्लास असणार आहे. त्यामुळे समोरून पाहिल्यावर डिस्प्ले जवळपास बॉर्डरलेस असल्यासारखा भासतो. डिस्प्लेच्या सर्व बाजूंना कर्व्ह डिस्प्ले सुमारे 1 मिमी रुंद असेल. 9to5mac च्या रिपोर्टमध्येही सुमारे 1 मिमी बेझल्सचा उल्लेख करण्यात आला आहे. कर्व्ड डिस्प्लेसाठी ॲप्पल गेल्या सुमारे 3 वर्षांपासून प्रयत्नशील असून त्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या प्रोटोटाइपमधील अधिक कर्व्ह असलेले डिझाइन कंपनीने कमी केले आहे. कर्व्ड स्क्रीन असलेले स्मार्टफोन्स दिसायला अत्यंत आकर्षक वाटतात, मात्र त्यांची काही मर्यादाही आहेत. कर्व्ड स्मार्टफोन्सच्या मजबुतीबाबत प्रश्न उपस्थित होतात; तसेच चुकून काचेला स्पर्श होणे, योग्य स्क्रीन प्रोटेक्शन न मिळणे आणि दुरुस्ती करताना येणाऱ्या अडचणी यांसारख्या समस्यांचाही अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.