Goldy Brar: लॉरेन्स बिश्नोई गँगमधील कुख्यात गुंड गोल्डी ब्रार याला अमेरिकेच्या 10 मोस्ट वॉन्टेड फरार आरोपींच्या स्थान दिले आहे. गोल्डी ब्रारला अटक करण्यास मदत करणाऱ्याला 10 लाख डॉलर्स म्हणजेच अंदाजे 8.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. गोल्डी ब्रा याला लॉरेन्स बिश्नोई गँगमधील उत्तर अमेरिकेतील टोळीचा प्रमुख कार्यकर्ता मानले जाते. त्यामुळे ब्रारच्या अटकेसाठी उपयुक्त माहिती देणाऱ्यास 10 लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. एफबीआयच्या म्हणण्यानुसार, गोल्डी ब्रार उत्तर अमेरिकेत लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कारभाराचे व्यवस्थापन करतो. या टोळीवर अमेरिका आणि कॅनडामध्ये खून, गोळीबार, खंडणी, अपहरण आणि अमली पदार्थांची तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश असल्याचा आरोप आहे.
कॅनडा मध्येही कुख्यात गुंड गोल्डी ब्रार अव्वलस्थानी
कॅनडानेही गोल्डी ब्रारला आपल्या 25 मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत पहिल्या स्थानावर ठेवले आहे. त्याला पकडण्यासाठी मदत करणाऱ्या किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीला अडीच लाख कॅनेडियन डॉलर्सचे (अंदाजे 1.63 अब्ज रुपये) बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. गोल्डी ब्रारवर कॅनडामध्ये खुनाचा आरोप आहे. अमेरिकेने गोल्डी ब्रारच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास बक्षीस आधीच जाहीर केले होते. याआधीही एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड यादीत त्याचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर आता कॅनडानेही त्याला आपल्या मोस्ट वॉन्टेड यादीत पहिल्या स्थानावर ठेवले आहे. अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांतील पोलीस आता गोल्डीच्या शोधात गुंतले आहेत. एफबीआयने 20 नोव्हेंबर रोजी गोल्डी ब्रारचा आपल्या मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश केल्याची घोषणा केली.
Chembur Accident: कर्तव्यावर असतानाच काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
मुंबई : चेंबूर येथील रहेजा अक्रोपोलिस गृहसंकुलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अॅडोनिस इमारतीमध्ये लोखंडी गेट कोसळून एका 46 वर्षीय सुरक्षा ...
अमेरिकेच्या तपास संस्थेने दावा केला आहे की, गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांनी कॅनडामधील एका प्रमुख राजकीय आणि धार्मिक नेत्याच्या हत्येचा आदेश दिला होता. त्यानुसार, 18 जून 2023 रोजी कॅनडातील सरे येथील गुरुद्वारातून त्या नेत्याची बाहेर पडत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तसेच पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या कटाचा आरोप या गँगवर आहे. 29 मे 2022 रोजी पंजाबमधील मानसा येथे झालेल्या मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रार आणि बिश्नोई टोळीच्या इतर सदस्यांनी स्वीकारली आहे. याशिवाय अमेरिकेत गोल्डी ब्रारवर अमली पदार्थांच्या तस्करीचे आरोपही आहेत. बिश्नोई टोळीने लॉस एंजेलिस परिसरातील इतर अमली पदार्थ तस्करांकडून मार्च 2024 ते जुलै 2025 दरम्यान अंदाजे 520 किलो कोकेन लुटले. त्यावरून 'ऑपरेशन हार्डबॉल' अंतर्गत लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर व्यक्तींचा अजूनही शोध सुरू आहे, त्यांमध्ये गोल्डी ब्रारचा समावेश आहे.