
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला (क्राईम ब्रँच) आणि आर्थिक गुन्हे शाखेला (ईओडब्ल्यू) आता अधिकृतपणे पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, या निर्णयामुळे दोन्ही विभागांना आता गंभीर आणि आर्थिक गुन्ह्यांप्रकरणी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करता येणार आहे. यापूर्वी संबंधित गुन्ह्यांची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवून त्यानंतर तपासासाठी ती क्राईम ब्रँच किंवा ईओडब्ल्यूकडे वर्ग केली जात होती.(Maharashtra Police)
नाशिक : राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला-लासलगाव मतदारसंघासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, ...
गृह विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या सह-पोलीस आयुक्तांच्या कार्यालयांना पोलीस ठाणे म्हणून घोषित करण्यात आले आहे. या दोन्ही पोलीस ठाण्यांचे स्थानिक क्षेत्र संपूर्ण मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीइतके असेल. त्यामुळे मुंबईत कुठेही घडलेल्या गुन्ह्याची एफआयआर या दोन्ही विभागांना दाखल करता येईल. ही पोलीस ठाणी मुंबई पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली काम करतील.(Crime Branch Police Station)
संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला जातो. तर, नऊ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जातो. यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये तक्रारदाराला संबंधित परिसरातील स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी लागत असे. त्यानंतर तपासासाठी प्रकरण गुन्हे शाखा किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले जात होते. नव्या अधिसूचनेमुळे ही प्रक्रिया टाळता येणार आहे.(EOW Maharashtra)
मुंबई : अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासह गुन्ह्यांच्या तपासातील त्रुटी दूर करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक ...
दरम्यान, हा निर्णय प्रशासकीय स्वरूपाचा असल्याचे गृह विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. यापूर्वी या दोन्ही विभागांना गुन्ह्यांचा तपास करणे आणि आरोपपत्र दाखल करण्याचे अधिकार होते. मात्र, स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा नसल्याने त्यांना एफआयआर दाखल करता येत नव्हता. आता पोलीस ठाण्यांप्रमाणे गुन्ह्यांची नोंद, एफआयआर आणि स्टेशन डायरी ठेवण्याची प्रक्रिया या विभागांना राबवता येणार आहे.(Law and Order Maharashtra)





