
मुंबई: मुंबईतील पर्यटनामध्ये भर घालण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून मुंबईतील प्रसिद्ध पवई तलावाला देशातील सर्वात भव्य म्युझिकल फाऊंटन म्हणून ओळख देण्यात येणार आहे. इथे, लाईट अँड साउंड शोमधून मराठ्यांची शौर्यगाथा उलगडणार आहे. मुंबईकरांच्या दृष्टीने हे ठिकाण प्रमुख आकर्षण ठिकाण बनवण्यासाठी राज्य सरकारकडून आता उपाययोजना केल्या जात आहेत. तब्बल 30 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा 180 मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन देशातील सर्वात मोठ्या कारंज्यांपैकी एक मानला जात आहे. या शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवगाथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक प्रभावी व भव्य स्वरूपात सादर केली जाणार आहे.
मुंबई: मध्य रेल्वेवरील मुंबई मंडळाच्या कसारा स्थानकावरील वाहतूक रात्री नऊ वाजल्यापासून विस्कळीत झाल्यामुळे उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अनेक ...
पवई तलावातील गणेश घाट येथे 'लाईट, साउंड आणि संगीतमय कारंजे शो'चा उद्घाटन सोहळा रविवारी सायंकाळी 7 वाजता पार पडणार आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मुंबई उपनगर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधी मिळाला आणि म्हाडाच्या वतीने हा प्रकल्प उभारण्यात आला. डिजिटल पद्धतीने नियंत्रित या प्रकल्पात तब्बल 40 मीटर (130 फूट) उंचीपर्यंत जाणारे वॉटर जेट्स, 27 फायर जेट्स, रनिंग फाउंटन चेसर्स, थ्रीडी स्विंग नॉझल्स, फॅन जेट्स, वॉटर स्क्रीन आणि लेझर प्रोजेक्शन यांचा समावेश असेल.
पवईच्या तलावावर करण्यात येणाऱ्या मल्टिमीडिया शोमध्ये विशेष दृश्य परिणामांसह तीन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. त्यामध्ये मराठ्यांचा इतिहास व पराक्रम, महाराष्ट्राची संस्कृती व वैभव आणि मुंबईची गौरवशाली कहाणी पर्यटकांना दाखवण्यात येणार आहे. या कारंज्यांमुळे दररोज सुमारे 30 लाख लिटर पाण्याचे एरेशन होऊन विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते. तसेच परिसरातील तापमान काही अंशी कमी होणे, थंडावा निर्माण होणे आणि हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होणे असे फायदे अपेक्षित आहेत. जलचरांचे संरक्षण राखण्यासाठी केवळ वरच्या दिशेने एलईडी प्रकाशझोत आणि निर्धारित डेसिबल मर्यादेत आवाज ठेवण्याची काळजी घेतली जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाने म्हाडाला अंमलबजावणी संस्था म्हणून नेमले असून, महानगरपालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि म्हाडा, महापालिका व कंत्राटदार यांच्यात त्रिपक्षीय करार झाला आहे.
मुंबई : चेंबूर येथील रहेजा अक्रोपोलिस गृहसंकुलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अॅडोनिस इमारतीमध्ये लोखंडी गेट कोसळून एका 46 वर्षीय सुरक्षा ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि मराठ्यांचा पराक्रम आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालतानाच मुंबईच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पर्यटनाला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. मुंबईला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माध्यमांना दिली आहे.
या प्रकल्पाच्या संचालनासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रशिक्षित कर्मचारी, स्वतंत्र कंट्रोल रूम, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन उपकरणे, अखंड वीजपुरवठ्यासाठी डीजी सेट, सुरक्षा रक्षक, प्राथमिक उपचार सुविधा, प्लास्टिक खुर्च्या आणि व्हीलचेअर यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. दररोज सुमारे तीन तासांच्या कालावधीत तीन शो आयोजित करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पाच्या निविदेत तीन वर्षांच्या सर्वसमावेशक देखभाल व दुरुस्तीची तरतूद असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांच्या संचालनाची तरतूद करण्यात आली आहे.
फाउंटनमध्ये केवळ एलईडी दिव्यांचा वापर करण्यात येणार असून, प्रकाश पाण्याच्या पृष्ठभागावरून वरच्या दिशेने दिला जाणार आहे. जलचरांना हानी पोहोचू नये, याची काळजी घेण्यात येणार आहे. तसेच ध्वनीची तीव्रता निर्धारित डेसिबल मर्यादेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली. पर्यावरणीय नियमांचे पालन करून हा प्रकल्प पर्यावरणपूरक पद्धतीने विकसित करण्यात आला आहे.




