Jijai Movie : स्त्रीशक्तीचा धगधगता अवतार! रिंकू राजगुरूचा ‘जिजाई’ चित्रपटगृहांत दाखल

अन्यायाविरोधात लढणाऱ्या स्त्रीच्या स्वाभिमानाची आणि संघर्षाची थरारक कहाणी ‘जिजाई’ चित्रपटातून उलगडणार आहे. रिंकू राजगुरू पहिल्यांदाच अॅक्शन अवतारात दिसत असून, २० नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा दिमाखदार प्रीमियर सोहळा नुकताच पार पडला.

मुंबई :  घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना कुटुंबासाठी सतत धडपडणारी स्त्री स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी किती संघर्ष करते? अन्याय सहन करणं हीच तिची नियती असते की त्याविरोधात आवाज उठवण्याची ताकदही तिच्यात असते? स्त्रीच्या याच संघर्षाची आणि तिच्यातील दुर्गेच्या रूपाची दमदार कथा झी स्टुडिओजच्या आगामी ‘जिजाई’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून, तिचा आजवर न पाहिलेला अॅक्शन अवतार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.






नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार प्रीमियर सोहळा पार पडला. चित्रपटाच्या ट्रेलरमधील थरारक दृश्यांनी आधीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. घनदाट जंगल, रात्रीचा काळोख, सुनसान रस्ता, बसमधील रहस्यमय प्रवास, पोलिसांचा तपास आणि रिंकू राजगुरूचे दमदार अॅक्शन सीन्स यामुळे ट्रेलरमध्ये उत्कंठावर्धक वातावरण निर्माण झाले आहे. रिंकू पहिल्यांदाच अॅक्शन भूमिकेत दिसत असून तिच्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय, तिच्यासमोर कोणती आव्हानं आहेत आणि या सगळ्यामागे कोणतं गूढ दडलं आहे, याची उत्सुकता ट्रेलरमधून कायम ठेवण्यात आली आहे. आता २० नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून या रहस्याचा उलगडा होणार आहे.





या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. त्यामुळे चित्रपटातील व्यक्तिरेखांचे परस्परसंबंध, कथानकातील अनपेक्षित वळणं आणि थरारक घडामोडी प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहेत.झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तृशांत फुलवंती इंगळे यांनी केले आहे. झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून नुपूर गुहा आणि तुषार राऊत सहनिर्माते आहेत. गुलराज सिंग यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे.


स्त्रीच्या अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा आणि अन्यायाविरोधात उभं राहण्याच्या तिच्या सामर्थ्याचा वेध घेणारा ‘जिजाई’ २० नोव्हेंबरपासून चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी अभिनेते मकरंद देशपांडे, शिव ठाकरे, शिवराज वायचळ, सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्यासह मनोरंजनविश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments
Add Comment

OM MOVIE REVIEW : 'पुष्पा'लाही मागे टाकणार ? धनुष-ममूटींचा 'OM: Operation Mole' चित्रपटगृहात दाखल; वाचा प्रेक्षकांचा पहिला रिव्ह्यू!

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार धनुष, ममूटी आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका

Bigg Boss 20 Extension: TRP चा धमाका! 'बिग बॉस 20' आणखी 2 ते 4आठवडे वाढणार?

Bigg Boss 20 Extension: सर्वाधिक चर्चेत असणारा रिॲलिटी शो ‘बिग बॉस 20’ बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. 6 सप्टेंबर 2026 रोजी सुरू

Kriti Sanon Dating: लंडन, ग्रीस आणि आता वाढदिवसाची पोस्ट! क्रिती-कबीरच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता

Kriti Sanon Dating: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅनॉन सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत

IFFI 2026 मध्ये मराठी सिनेमाचा डंका! 13 मराठी चित्रपट महोत्सवात झळकणार

गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडणार असून यंदाच्या

दोन वर्षांनंतर हर्षद अतकरी छोट्या पडद्यावर; 'येतेच आता मी नांदायला'मध्ये साकारणार अभिजीत थोरात

Yetach Ata Mi Nandayla: 'येतेच आता मी नांदायला' या झी मराठीच्या आगामी मालिकेतून अभिनेता हर्षद अतकरी जवळपास दोन वर्षांनंतर

Samantha Ruth Prabhu news : समंथा प्रभू आणि राज निदिमोरू यांच्या घरी चिमुकल्या 'देव'चे आगमन; पहिला फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Prabhu) आणि चित्रपट निर्माते राज निदिमोरू (Raj Nidimoru) यांच्या संसारात एका