Kriti Sanon Dating: बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सॅनॉन सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. 9 वर्षांनी लहान असलेल्या एका लंडनमध्ये राहणाऱ्या बिझनेसमॅन सोबत क्रितीचे नाव जोडले जात आहे. क्रिती आणि बिजनेसमॅन कबीर यांच्या डेटिंगच्या चर्चाना उधाण आला आहे. कबीरच्या वाढदिवसानिमित्त क्रितीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने कबीरला बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे क्रिती सेनॉन आणि कबीरच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चा रंगल्या आहेत.
लंडनमध्ये राहणारा व्यावसायिक कबीरसोबत नात्याच्या अफवा बऱ्याच काळापासून सुरु आहेत. जरी दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याला मीडियासमोर संमती दिली नसली तरी त्यांच्या सोशल मीडियावरील छोट्या-छोट्या हालचालींमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता कृतीने कबीरच्या वाढदिवसानिमित्त इतकी गोड पोस्ट शेअर केली आहे की चाहते त्यांच्या लग्नाचीही चर्चा करत आहेत.
IFFI 2026 मध्ये मराठी सिनेमाचा डंका! 13 मराठी चित्रपट महोत्सवात झळकणार
गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पार पडणार असून यंदाच्या महोत्सवात 13 कोंकणी चित्रपट प्रदर्शित केले ...
कबीरचा वाढदिवस 19 नोव्हेंबरला होता. हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी, कृतीने तिच्या सोशल मीडिया स्टोरीवर त्याचा एक फोटो शेअर केला. कबीरचा बीचवरील फोटो शेअर करत तिने "हॅपी बर्थडे क्युटी" असं कॅप्शन दिलं होतं. क्रितीची ही पोस्ट व्हायरल झाली आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाल्या. काही चाहत्यांनी क्रिती आणि कबीर यांना लग्न करण्याचा सल्लाही दिला आहे.
फोटोमध्ये, कबीर एका सुंदर सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर पोज देताना दिसत आहे. मात्र, त्याचा गमतीशीर चेहरा हा फोटो आणखीच मजेशीर बनवतो. कृतीची ही पोस्ट पाहून चाहते आपला उत्साह लपवू शकले नाहीत. सोशल मीडियावर लोकांनी या जोडीवर विविध प्रकारे प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका युझरने लिहिले, "मला वाटतं हे दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत. तीन वर्षे झाली आहेत." दुसऱ्या एकाने लिहिले, "कल्पना कर की कृती सॅनॉन तुला 'क्युटी' म्हणतेय. तू किती नशीबवान आहेस, यार." एकाने तर थेट लग्नाबद्दल विचारले की, ते दोघे अखेर लग्न कधी करणार आहेत. कृतीच्या वाढदिवसाच्या छोट्या पोस्टमुळे चाहते त्यांच्या प्रेमकथेच्या पुढील टप्प्याची स्वप्ने पाहत आहेत.
लंडनमध्ये हातात हात घालून, मग ग्रीसमध्ये एकत्र वाढदिवस साजरा केला.
कृती आणि कबीरच्या नात्याच्या चर्चा लंडनमधून मार्च 2024 मध्ये एक फोटो व्हायरल झाला होता तेव्हापासून सुरु झाला होता. ज्यामध्ये कृती एका अनोळखी व्यक्तीसोबत हात धरून दिसत होती. नंतर त्या व्यक्तीची ओळख कबीर म्हणून पटली. काही महिन्यांनंतर, जुलै 2024 मध्ये, ते दोघे ग्रीसमधील मायकोनोस येथे एकत्र वेळ घालवताना दिसले आणि कृतीचा वाढदिवस साजरा करत होते. मात्र, कृती किंवा कबीर या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्यामुळे कबीरच कृतीचा बॉयफ्रेंड आहे हे अद्याप निश्चित नाही.