Nashik Accident News : लग्नकार्य असो किंवा एखादं धार्मिक काम... घरातून बाहेर पडलेली तरुण मुलं सुखरूप परत यावीत, हीच प्रत्येक कुटुंबाची अपेक्षा असते. मात्र, कोपरगावमध्ये झालेल्या भीषण अपघाताने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सिन्नर तालुक्यातील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
नेमकं काय घडलं ?
शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील संवसर गावाजवळील कांदा मार्केट परिसरात हा भीषण अपघात घडला. छत्रपती संभाजीनगर येथील खाटूश्याम मंदिरात होमगार्डचे काम आटोपून तिघेही संगमनेरच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते. यावेळी वैजापूर मार्गे प्रवास करत असताना समोरून आलेल्या राखाडी रंगाच्या मारुती स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
Nashik Crime : पत्नीच्या खुनाचा खोटा कॉल करणं पडलं महागात ! पतीविरोधात गुन्हा दाखल
दिंडोरी: नाशिकच्या दिंडोरीमध्ये एका व्यक्तीने चक्क आपल्या पत्नीचा खून झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. विशेष म्हणजे, डायल ११२ या आपत्कालीन ...
या अपघातात सोमठाणे येथील अमोल मधुकर रुकारी आणि मऱ्हळ येथील महेश दिनकर कुऱ्हे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोमठाणे येथील कुणाल शांताराम धोकरट हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कारचालकाने भरधाव वेगात आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवत दुचाकीला धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. या दुर्घटनेमुळे सोमठाणे आणि मऱ्हळ परिसरात शोककळा पसरली असून, दोन तरुणांच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.