
ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: भारत 'ए' विरुद्ध पाकिस्तान 'ए' संघ
भारत ए संघ : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्रा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्षित राणा, प्रिन्स यादव, तनुष कोटियान, प्रभसिमरन सिंग, हर्षद खान, अरशद खान.
पाकिस्तान ए संघः शमिल हुसेन, माझ सदाकत, रोहेल नझीर (यष्टीरक्षक), हसन नवाज, अब्दुल समद (कर्णधार), फरहान युसूफ, साद मसूद, मोहम्मद इम्रान रंधावा, अहमद दानियाल, सुफयान मोकीम, अली रझा, शाहजेब खान, हैदर अली, मोहम्मद हसनैन, दानिश अझीझ
ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: बांगलादेश आणि श्रीलंका यांचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित
'अ' गटातून बांगलादेश आणि श्रीलंका यांनी उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. दोघांनीही आपापले सलामीचे सामने जिंकले असून आता ते एकमेकांविरुद्ध खेळतील. हाँगकाँग आणि अफगाणिस्तान गट फेरीतून बाहेर पडले आहेत.
ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: भारत पाकिस्तान लाईव्ह सामना कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवरही थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) उपलब्ध असेल.
ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: भारत पाकिस्तान सामना किती वाजता आहे?
आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेतील भारत ए आणि पाकिस्तान ए यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होईल. तर नाणेफेकीचा कौल हा दुपारी 3 वाजता होईल.
ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मधील भारत 'ए' विरुद्ध पाकिस्तान 'अ' संघाचा आठवा सामना कधी खेळला जाईल?
आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मधील भारत 'ए' विरुद्ध पाकिस्तान 'ए' संघाचा आठवा सामना आज म्हणजेच 22 नोव्हेंबर (रविवार) रोजी खेळला जाईल.






