Saturday, November 21, 2026

इंग्लंडविरुद्ध U-19 महिला टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; भाविका अहिरेच्या हाती कर्णधारपद

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या U-19 महिला टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भाविका अहिरे संघाचे नेतृत्व करणार असून अनादी तागडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेसाठी भारतीय 19 वर्षांखालील महिला (Under 19 Women's Team) संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी भाविका अहिरेची (Bhavika Ahire) संघाची कर्णधार म्हणून तर अनादी तागडे (Anadi Tagde) उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान वडोदरा आणि सुरत येथे खेळवली जाणारी ही मालिका, आगामी आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी 20 विश्वचषक 2027 साठी भारतीय युवा संघाच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग असेल. ही टी 20 मालिका 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान वडोदरा आणि सुरत येथे खेळवली जाईल. जानेवारीमध्ये होणाऱ्या आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी 20 विश्वचषक 2027 च्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण ठरेल. या मालिकेची सुरुवात 26 नोव्हेंबर रोजी वडोदरा येथे पहिल्या टी 20 सामन्याने होईल, त्यानंतर दुसरा सामना 28 नोव्हेंबर रोजी त्याच ठिकाणी खेळला जाईल. दोन्ही सामने अनुक्रमे सायंकाळी सहा आणि दुपारी एक वाजता सुरू होतील.
ही मालिका त्यानंतर सुरतला खेळली जाईल, जिथे उर्वरित सामने 1, 3 आणि 6 डिसेंबर रोजी खेळवले जातील. तिसरा आणि चौथा टी20 सामना सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. तर अंतिम सामना दुपारी एक वाजता खेळला जाईल. ही मालिका युवा भारतीय संघासाठी मोठ्या स्पर्धेपूर्वी आपल्या संघरचना आजमावून पाहण्याची आणि गती मिळवण्याची एक उत्तम संधी असेल. भारतीय संघ आयसीसी 19 वर्षांखालील (Under 19 Women's Team) महिला टी 20 विश्वचषकाचा दोन वेळचा गतविजेता आहे. या संघाने 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला आणि त्यानंतर 2025 मध्ये मलेशियात विजेतेपद कायम राखले. संघातील प्रमुख खेळाडू भाविका अहिरे (कर्णधार, यष्टीरक्षक), इरा जाधव, निधी महतो, पूर्वा सिवाच, मेहक नरवसे, मैत्री मणियार, ईश्वरी अवसरे, दिया यादव, श्रेया एस. चव्हाण, समायरा राघव, कुमारी पलक, उमा काशवी, अक्सा परमार, अनादी तगडे आणि पलक सिंग
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >