
मुंबई : सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिच्या बंगळुरू येथील लाईव्ह कार्यक्रमात अभिनेत्री श्रद्धा कपूर (shraddha Kapoor) हिने अचानक मंचावर येत प्रेक्षकांना गोड धक्का दिला. श्रद्धाच्या येत्या 'ईठा' (Eetha) चित्रपटातील 'जी जी रे जी' हे गाणे श्रेयाने गायले असून, हे गाणे आधीच लोकांच्या पसंतीस उतरले आहे. श्रद्धा स्टेजवर आल्यानंतर श्रेयाने हे गाणे गायले आणि या दोघींचे या कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहेत. या भेटीनंतर सोमवारी श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर एक मनमोकळी आणि भावनिक पोस्ट करत श्रेयाबद्दल आपले प्रेम व्यक्त केले.
'आशिकी २'च्या काळातील जुन्या आठवणी
View this post on Instagram
नवी दिल्ली : दिल्लीतील जामा मस्जिद पोलीस ठाण्यामध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने थेट पोलिसांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पाच ...
१३ वर्षांपूर्वी 'आशिकी २' या चित्रपटात श्रेयाने साकारलेल्या 'आरोही' या भूमिकेसाठी गाणी गायली होती आणि त्याच वेळी आपले संपूर्ण आयुष्य बदलून गेले, अशी आठवण श्रद्धाने सांगितली. आपल्या पोस्टमध्ये ती म्हणाली की, ज्यांच्या आवाजामुळे तेरा वर्षांपूर्वी माझे आयुष्य बदलले, त्याच श्रेया घोषाल यांनी 'जी जी रे जी' हे गाणे गायले आहे, हे ऐकून खूप जादुई वाटते; काल मंचावर बोलावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
WHAT A SURPRISE FULL CONCERT OF SHREYA GHOSHAL 😍❤️
Today there was concert of Shreya Ghoshal in Bangalore and there was so many surprise guest 🥹❤️ - Shreya Ghoshal surprise performance with Kalyani song boys - Shraddha Kapoor surprising entry 😍 - Shraddhan Kapoor also sang 'Sun raha hai na tu ' 😍 - and Even Badshah came as surprise guest 😍 This concert was full of surprises 🥹❤️ — Jeet (@JeetN25) November 22, 2026
श्रेया घोषालचे श्रद्धाला आपुलकीचे उत्तर
श्रद्धाच्या या पोस्टवर श्रेया घोषाल हिनेही तितक्याच प्रेमाने उत्तर दिले. श्रेयाने लिहिले की, माझ्या लाडक्या श्रद्धा, तू मंचावर खूप छान सादरीकरण केलेस आणि बंगळुरूच्या या कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आणि सुंदरता आणलीस; 'आशिकी २'पासून ते थेट 'ईठा'पर्यंतचा आपला प्रवास या मंचावर पुन्हा जिवंत झाला, त्यासाठी खूप धन्यवाद. बंगळुरूच्या कार्यक्रमात श्रेया घोषाल आणि श्रद्धा कपूर एकत्र आल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. या दोघींना एकत्र पाहून चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे.
'ईठा' कधी येणार आणि बॉक्स ऑफिसवर कोणाशी टक्कर ?
श्रद्धा कपूरचा 'ईठा' हा चित्रपट आधी ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार होता, पण काही कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत येत आहे. हा चित्रपट एकटाच प्रदर्शित होईल असे आधी वाटत होते, पण काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान याने आपला 'मातृभूमी' हा चित्रपटही ४ डिसेंबरलाच प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी येत असल्याबद्दल बोलताना सलमान म्हणाला की, 'मातृभूमी'ची तारीख जाहीर करताना 'ईठा' त्याच दिवशी येणार असल्याची त्याला माहिती नव्हती. त्यानंतर त्याने श्रद्धाला फोन केला; त्यावर दोन चित्रपट एकाच वेळी चित्रपटगृहांत आले तरी दोघेही चांगली कमाई करू शकतात, असे श्रद्धाने त्याला सांगितल्याचे सलमानने स्पष्ट केले.






