न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल संतापला, खेळपट्टीबाबत सरळ म्हणाला की...

न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. भारताने चौथ्या आणि पाचव्या दिवशी न्यूझीलंडचे विकेट काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र 5 विकेटच घेता आल्या. असं असताना आता खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर कर्णधार शुभमन गिलने घेतलेला हा निर्णय योग्यच होता. कारण पहिल्याच दिवशी न्यूझीलंडचा निम्मा संघ भारताने गारद केला होता. त्यानंतर हेनरी निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी डाव सावरला आणि टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं. न्यूझीलंडने पहिल्या डावात 368 धावांची खेळी केली. पहिल्या डावातील या खेळीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि 720 धावा करत डाव घोषित केलं. यासह भारताने पहिल्या डावात 352 धावांची मजबूत आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढणं काही न्यूझीलंडला जमेल असं वाटलं नाही. त्यामुळे भारताचा विजय निश्चित मानला जात होता. त्यात चौथ्या आणि पाचव्या दिवशीचा खेळ शिल्लक होता. पण न्यूझीलंडच्या फलंदाजांनी झुंजार खेळी केली करत चौथा आणि पाचवा दिवस खेळून काढला. न्यूझीलंडने 120 षटकांचा सामना केला आणि 5 गडी गमवून 239 धावा केल्या. त्यामुळे हा सामना ड्रॉ करण्याशिवाय पर्याय उरला नाही. असं असताना आता दुसऱ्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर लक्ष लागून आहे. शुभमन गिलने सांगितलं की, क्राइस्टचर्चच्या हेगले ओव्हल मैदानात गोलंदाजांना काही अंशी मदत मिळायला हवी असं मत व्यक्त केलं आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार गिल काय म्हणाला?


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना 27 नोव्हेंबरला होणार आहे. पहिल्या सामन्यानंतर शुभमन गिलला प्रश्न विचारला गेला की दुसऱ्या सामन्यात काय बदल अपेक्षित आहे? तेव्हा त्याने सांगितलं की, 'खरं सांगायचं तर, काही विशेष नाही. आशा आहे की, क्राइस्टचर्चची खेळपट्टी गोलंदाजांना थोडी अधिक मदत करेल. जर आम्ही तिथे याच पद्धतीने खेळलो आणि फलंदाजी व गोलंदाजीमधील आमच्या योजनांची योग्य अंमलबजावणी केली, तर आमची स्थिती चांगली असेल.' दुसरीकडे, गचाळ क्षेत्ररक्षणाबाबत विचारलं असता शुभमन गिल म्हणाला की, 'तसं काही नाही. मला वाटतं की आम्हाला माहित होतं की त्या खेळपट्टीवर दहा बळी मिळवणं एक आव्हान असणार आहे. पण मला वाटतं की आम्हाला संधी मिळाल्या, तळाच्या फलंदाजांसोबत अधूनमधून एक-दोन संधी मिळाल्या, पण नेमकं काय होईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे मला वाटतं की क्षेत्ररक्षणात आमचा दिवस चांगला गेला.'





हस्तांदोलन करण्यापूर्वी काय चर्चा झाली होती?


हस्तांदोलनाच्या क्षणाबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला गौतम गंभीरसोबत मैदानाबाहेर पाहिलं. तिथे काय चर्चा झाली? आणि ती चर्चा पुढे चालू ठेवण्यासारखी होती का? किंवा ती चर्चा कशी झाली? या प्रश्नावर शुभमन गिल म्हणाला की, 'जर खेळपट्टीवर थोडी अधिक मदत असती, तर कदाचित, पण वेगवान गोलंदाज थकले होते, त्या सर्वांनी सामन्यात जवळपास 50 षटकं टाकली होती. आणि यष्टीरक्षणाचा विचार करता, उद्या प्रवासासह फक्त तीन दिवसांत पुढचा सामना असल्याने खूप कमी वेळ आहे. त्यामुळे, आम्हाला आमच्या सर्व गोलंदाजांना ताजेतवाने ठेवायचे होते. आणि, 5-10 अतिरिक्त षटकांमुळे इतका फायदा होईल असे खरंच वाटले नव्हते.'
Comments
Add Comment

WTC Points Table: वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्याने टीम इंडियाचा अंतिम फेरीचा मार्ग खडतर, कसं काय ते जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ड्रॉ

Madhi Cross Country: धावपटूंसाठी पर्वणी! मढी येथे 6 तारखेला क्रॉस कंट्री स्पर्धा रंगणार

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, अहिल्यानगर आणि शिवछत्रपती करिअर अकॅडमी पाथर्डी

IND vs NZ सामना ड्रॉ, टीम इंडियाने हातातला सामना गमावला

मुंबई: वेलिंग्टन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जात असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित अर्थात ड्रॉ

भारत-न्यूझीलंड शताब्दी हॉकी मालिकेत भारताचा दणदणीत विजय; अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानंतरही 1-0 ने मारली बाजी

भारतीय पुरुष हॉकी संघाने यजमान न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची ऐतिहासिक 'भारत-न्यूझीलंड शताब्दी क्रीडा

Syed Mushtaq Ali Trophy: अवघ्या 9 चेंडूंत 5 बळी! रेल्वेचा गोलंदाज जमशेद आलम ठरला डबल हॅट्ट्रिक घेणारा तिसरा भारतीय

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेत  रेल्वेच्या वेगवान गोलंदाज जमशेद आलमने इतिहास रचला. आपला पहिला टी20 सामन्यात

भारत-पाकिस्तान सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा! पाकिस्तानी फलंदाजाशी भिडला हर्षित राणा; पाहा Video

एसीसी पुरूष आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि पाकिस्तान ए संघ आमनेसामने आले आह. पारंपरिक