Syed Mushtaq Ali Trophy: अवघ्या 9 चेंडूंत 5 बळी! रेल्वेचा गोलंदाज जमशेद आलम ठरला डबल हॅट्ट्रिक घेणारा तिसरा भारतीय

रेल्वेचा वेगवान गोलंदाज जमशेद आलमने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मध्ये आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच टी20 सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सौराष्ट्रविरुद्ध खेळताना आलमने डावाच्या चौथ्या षटकात सलग चार चेंडूंवर चार बळी घेण्याचा पराक्रम केला.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेत  रेल्वेच्या वेगवान गोलंदाज जमशेद आलमने इतिहास रचला. आपला पहिला टी20 सामन्यात खेळताना त्याने ऐतिहासिक कामगिरी केली. आलमने सौराष्ट्रविरुद्ध सलग चार चेंडूंवर चार बळी घेत इतिहास रचला आहे. यासह त्याने आपल्या संघाला 29 धावांनी दणदणीत विजय मिळवून देण्यात योगदान दिलं. आलमने सौराष्ट्रच्या डावातील चौथ्या षटकात सलग चार चेंडूंवर हरविक देसाई, प्रेरक मांकड, रुचित अहिर आणि समर गज्जर यांना बाद केले. यासह टी20 क्रिकेटमध्ये सलग चार चेंडूंवर चार बळी घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी कर्नाटकचा अभिमन्यू मिथुन आणि विदर्भाचा दर्शन नळकांडे यांनी ही कामगिरी केली आहे.


आलमने सहाव्या षटकात आणखी एक विकेट घेऊन विकेटचा पंच पूर्ण केला. त्याने सिद्धांत राणाला बाद करून आपले पाच बळी पूर्ण केले. त्याने अवघ्या नऊ चेंडूंमध्ये पाच बळी घेतले. क्रिकइन्फोच्या मते, टी20 क्रिकेटमध्ये केवळ इंडोनेशियाचा गेडे प्रियंदना आणि फिनलंडचा महेश तांबे यांनीच त्याच्यापेक्षा कमी चेंडूंमध्ये पाच बळी घेतले आहेत. आलमने चार षटकांत 38 धावा देऊन पाच बळी घेतले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे सौराष्ट्र आठ गडी गमावून 153 धावा करू शकला. सौराष्ट्रकडून हरवंश पंगालियाने 61 चेंडूंमध्ये नाबाद 80 धावा केल्या, तर  फुलेत्राने 23 चेंडूंमध्ये नाबाद 36 धावा केल्या आणि मोहित उल्वाने 15 चेंडूंमध्ये 22 धावांचे योगदान दिले. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना रेल्वेने आपल्या निर्धारित 20 षटकांत 183 धावा केल्या होत्या. जयंत लखनने संघासाठी 39 चेंडूंमध्ये 47 धावा केल्या, तर रवी सिंगने 32 धावा आणि झुबेर अली खानने 27 धावांचे योगदान दिले.


स्पर्धेतील इतर सामन्यांमध्ये राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि विदर्भ यांनीही विजय नोंदवले. राजस्थानने मिझोरमला 67 धावांनी पराभूत करून 'अ' गटातील आपले स्थान अधिक मजबूत केले. प्रथम फलंदाजी करताना, राजस्थानने पाच गडी गमावून 224 धावांचा डोंगर उभा केला. यष्टीरक्षक-फलंदाज कुणाल सिंग राठोडने नाबाद 116 धावांची शानदार खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना, मिझोरमला आपल्या निर्धारित 20 षटकात पाच गडी गमावून केवळ 157 धावाच करता आल्या. चिन्मय सुतारने  25 चेंडूंमध्ये 48 धावा केल्या, तर खियांगटे वनरोटलिंगाने 34 आणि बी लालनुनफेलाने 23 धावांचे योगदान दिले. या विजयासह, राजस्थानने पाच सामन्यांत चार विजय मिळवून 'अ' गटात अव्वल स्थान पटकावले.






हिमाचल प्रदेशने त्यांच्या गट 'क' मधील सामन्यात त्रिपुराला 32 धावांनी हरवले. प्रथम फलंदाजी करताना हिमाचलने 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात, त्रिपुराला आठ गडी गमावून केवळ 151 धावाच करता आल्या. हिमाचलच्या विजयात वेगवान गोलंदाज रोहित कुमारने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने चार षटकांत 16 धावा देऊन तीन बळी घेतले. त्रिपुराकडून लक्ष्य थरेजाने अर्धशतकी खेळी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या विजयामुळे हिमाचल प्रदेश पाच सामन्यांत चार विजय मिळवून गट 'क' मध्ये अव्वल स्थानी आहे. त्यांचे 16 गुण आहेत, तर मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांचे प्रत्येकी 12 गुण आहेत.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा! पाकिस्तानी फलंदाजाशी भिडला हर्षित राणा; पाहा Video

एसीसी पुरूष आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि पाकिस्तान ए संघ आमनेसामने आले आह. पारंपरिक

ऋषभ पंतने न्यूझीलंडच्याच मैदानावर मॅककुलमला टाकले मागे; वेलिंग्टनमध्ये ऐतिहासिक धमाका

[caption id="attachment_1077884" align="aligncenter" width="800"] इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर आपल्या आक्रमक फलंदाजीची चुणूक दाखवणाऱ्या

Global Peace Honours 2026 : सचिन तेंडुलकर यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’ पुरस्कार; गेटवे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सन्मान

मुंबई : भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना त्यांच्या सामाजिक आणि परोपकारी कार्यासाठी ‘ग्लोबल पीस

जमिनीवर आदळला, पण चेंडू सुटू दिला नाही! ध्रुव जुरेलने पकडला अप्रतिम झेल, प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात मोठी विकेट Watch Video

भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून निर्णायक स्थितीत आहे. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा

IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात रचला इतिहास, 27 वर्षे जुना विक्रम मोडला

भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून निर्णायक स्थितीत आला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून

IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी केली ऐतिहासिक कामगिरी, 149 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

[caption id="attachment_1077725" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. वेलिंग्टन