भारत-पाकिस्तान सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा! पाकिस्तानी फलंदाजाशी भिडला हर्षित राणा; पाहा Video

एसीसी आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामना होत आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि सावध सुरुवात केली. त्यामुळे भारताला विकेटसाठी चांगलाच घाम गाळावा लागला. पण जेव्हा विकेट मिळाली तेव्हा मात्र हर्षित राणाचा पारा चढला.

एसीसी पुरूष आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि पाकिस्तान ए संघ आमनेसामने आले आह. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने सामना रंगतदार होणार यात काही शंकाच नाही. कारण जेव्हा पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ भिडतात तेव्हा शाब्दिक चकमक पाहायला मिळते. भारत पाकिस्तान सामना दोहाच्या वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज हर्षित राणाने आक्रमक अंदाज दाखवला. त्यामुळे मैदानात काही काळ वातावरण तापलं होतं. या सामन्यात हर्षित राणा याची सलामीला आलेल्या शमील हुसैन आणि माज सदाकत यांच्यासोबत वाद झाला. हर्षित राणाने गोलंदाजी करताना या दोन्ही फलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.पण त्यांची विकेट काही मिळाली नाही. या जोडीने हर्षित राणा आणि प्रिन्स यादव चौकार आणि षटकार मारले. तसेच सहा षटकात 60हून अधिक धावा केल्या.

हर्षित राणाने डिवचलं आणि शामील हुसैन फसला


पाकिस्तानी सलामीवीरांकडून होत असलेली आक्रमक खेळी पाहून हर्षित राणा संतापला होता. त्यामुळे त्यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नव्हता. चूक करून विकेट मिळेल, यासाठी त्याचा प्रयत्न सुरू होता. माज सदाकतने तर हर्षितच्या स्लेजिंगला काही उत्तर दिलं नाही. पण शामील हुसैन त्याच्या जाळ्यात फसला. या दोघांमध्ये दोन तीन वेळा शाब्दिक चकमक झाली. यात शामिल हुसैनचं लक्ष विचलीत झालं आणि त्याचा फायदा इंडिया ए संघाला झाला. पाकिस्तानच्या डावाच्या आठव्या षटकात शमीलने आयुष बडोनीच्या संथ आणि फ्लाइट चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा टायमिंग चुकला. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला उभ्या असलेल्या हर्षित राणाच्या हातात गेला. शमील बाद झाल्यानंतर, हर्षितने त्याला आक्रमकपणे निरोप दिला.










हर्षित राणा गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त होता आणि टीम इंडियाच्या बाहेर आहे. आता भारत ए संघातून पुनरागमन करत आहे. शामील हुसैन बाद झाल्यानंतर रोहेल नजीर फलंदाजीला आला. पण हर्षित राणाने त्याला पायचीत केलं आणि तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे पाकिस्तानच्या धावगतीला ब्रेक लागला. हर्षिता राणाचा आक्रमक अंदाज भारत ए संघाच्या पथ्यावर पडला असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, नेपाळविरुद्धच्या सामन्यात हर्षित राणाने शानदार गोलंदाजी केली. त्याने सहा षटकांत 16 धावा देऊन चार बळी घेतले होते. त्या सामन्यात भारत ए संघाने नेपाळचा 306 धावांनी पराभव केला होता.
Comments
Add Comment

ऋषभ पंतने न्यूझीलंडच्याच मैदानावर मॅककुलमला टाकले मागे; वेलिंग्टनमध्ये ऐतिहासिक धमाका

[caption id="attachment_1077884" align="aligncenter" width="800"] इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर आपल्या आक्रमक फलंदाजीची चुणूक दाखवणाऱ्या

Global Peace Honours 2026 : सचिन तेंडुलकर यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’ पुरस्कार; गेटवे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सन्मान

मुंबई : भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना त्यांच्या सामाजिक आणि परोपकारी कार्यासाठी ‘ग्लोबल पीस

जमिनीवर आदळला, पण चेंडू सुटू दिला नाही! ध्रुव जुरेलने पकडला अप्रतिम झेल, प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात मोठी विकेट Watch Video

भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून निर्णायक स्थितीत आहे. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा

IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात रचला इतिहास, 27 वर्षे जुना विक्रम मोडला

भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून निर्णायक स्थितीत आला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून

IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी केली ऐतिहासिक कामगिरी, 149 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

[caption id="attachment_1077725" align="aligncenter" width="800"] न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. वेलिंग्टन

ASIA CUP 2026, IND vs PAK Live Updates: पाकिस्तानला चौथा धक्का, कर्णधार अब्दुल समद धावबाद

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत क्रीडाप्रेमींना हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. पारंपरिक