Orry Viral Photo: ऑरीच्या सिग्नेचर पोझवरून नवा वाद; अनन्या पांडेसोबतचा फोटो व्हायरल

ओरहान अवत्रामणी (ऑरी) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या पोस्ट्स आणि त्याची शैली सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. नुकताच अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या पोझबद्दल नेटकऱ्यांनी फोटोबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

Orry Viral Photo: ओरहान अवत्रामणी (ऑरी) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या पोस्ट्स आणि त्याची शैली सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. नुकताच अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या पोझबद्दल नेटकऱ्यांनी फोटोबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

ऑरीला पार्ट्या करायला खूप आवडतात. तो अनेकदा स्टार किड्ससोबत आलिशान पार्ट्या देताना दिसतो. पण आता, ऑरीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना थक्क केले आहे. ऑरीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पार्टीमधील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो बॉलिवूडच्या अभिनेत्री अनन्या पांडे आणि शनाया कपूरसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसला.


ऑरीने, नेहमीप्रमाणेच सेलिब्रिटींसोबत त्याच्या खास शैलीत फोटोस काढले आहेत. परंतु सध्या ऑरी चर्चेत आलाय ते अनन्या पांडेसोबत काढलेल्या फोटोमुळे. या फोटोमध्ये ऑरी नेहमीप्रमाणे त्याच्या 'सिग्नेचर स्टाईल'मध्ये अनन्याच्या छातीवर हात ठेवून पोज देताना दिसत आहे. पण या वेळी, ऑरीने कदाचित थोडी मर्यादा ओलांडली असावी, असे बोलले जात आहे. अनन्याच्या छातीवर हात ठेवल्याबद्दल लोक ओरीवर टीका करत आहेत.






ऑरी आणि अनन्या पांडे यांचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनन्याच्या छातीवर ओरीचा हात पाहून लोक चकित झाले आहेत. व्हायरल फोटोंच्या कमेंट सेक्शनमध्ये विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युझरने विचारले, "अनन्याने त्याला स्पर्श करायला कसे काय परवानगी दिली?" तर दुसऱ्याने, ओरीने अनन्याला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला. दरम्यान, अनेकजण गंमतीने अनन्या पांडेसाठी न्यायाची मागणी करत आहेत. ओरी आणि अनन्याच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. ओरी आणि शनाया कपूर यांच्यातील खास नातेही स्पष्टपणे दिसून आले आहे. शनाया कॅज्युअल पोशाखात खूपच सुंदर दिसत होती, तर अनन्या पांडेची जीन्स आणि पांढऱ्या क्रॉप टॉपमधील स्टाईलही पाहण्यासारखी होती.


काही सोशल मीडिया युजर्सनी ही पोज अयोग्य आणि वैयक्तिक मर्यादांचे उल्लंघन करणारी असल्याचे म्हणत टीका केली आहे. तर दुसरीकडे, ऑरी आणि अनन्या हे जुने मित्र आहेत आणि ऑरी सेलिब्रिटींसोबत नेहमीच अशा प्रकारची सिग्नेचर पोज देतो, त्यामुळे यात अनन्याच्या संमतीचा प्रश्न नसल्याचे काहींचे मत आहे.

Comments
Add Comment

Sapna Choudhary Divorce: सहा वर्षांच्या संसारात दुरावा! सपना चौधरी पती वीर साहूपासून घेणार घटस्फोट

हरियाणवी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय नाव असलेली गायिका आणि डान्सर सपना चौधरी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे

Kaun Banega Crorepati : स्वप्न सत्यात उतरलं! KBC च्या मंचावर भूषण ठाकरे ठरला या सीजनचा पहिला करोडपती

मुंबई :  जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एखादी व्यक्ती किती मोठे यश मिळवू शकते, याचे उदाहरण जळगावच्या 28 वर्षीय

महागुरु सचिन पिळगावकरांना मानद डॉक्टरेट! ग्वाल्हेरच्या ITM विद्यापीठाकडून गौरव

Sachin Pilgaonkar Doctorate University: मराठी चित्रपटसृष्टीतील महागुरुंचा ग्वालेरमध्ये डॉक्टर ऑफ लिट्रेचर पदवीने गौरव करण्यात आला आहे.

Nitesh Rane : ‘सिरीयल किलर’ नाटकाच्या 100 व्या प्रयोगाला मंत्री नितेश राणे यांची खास उपस्थिती; टीमचे केले कौतुक

मुंबई : मराठी रंगभूमीवरील ‘सिरीयल किलर’ या नाटकाने 100 प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मुंबईतील दादर

गोव्यात IFFI महोत्सवात महाराष्ट्राचे विशेष दालन; चित्रनगरीच्या 50 वर्षांचा गौरव

गोवा: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट

KBC मधील पंजाबवरील प्रश्नामुळे वाद; अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीला कायदेशीर नोटीस

Kaun Banega Crorepati: महानायक अमिताभ यांचा कौन बनेगा करोडपती या सोनी टीव्हीवरील शोमुळे खुद्द बिग बी आणि चॅनेल दोघांच्या