Malvika Gaekwad: 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्री मालविका गायकवाड देणार गुडन्यूज; पतीसोबत शेअर केले प्रेग्नन्सीचे खास फोटो!

'मुळशी पॅटर्न'मधील चहावालीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मालविका गायकवाड लवकरच आई होणार आहे. पती सिद्धार्थ सिंघवीसोबतचे खास फोटो शेअर करत तिने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

1/5 1. सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज
मालविका सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच तिने पती सिद्धार्थ सिंघवीसोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून तिने आपल्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली.(Photo: Instagram)

2/5 2. बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केले फोटो
या फोटोंमध्ये मालविका हिरव्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे, या फोटोंमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय. तिच्यासोबत पती सिद्धार्थ सिंघवीदेखील आहे. दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद या फोटोंमधून स्पष्ट दिसत आहे. (Photo: Instagram)

3/5 3. कॅप्शनने वेधले लक्ष
मालविकाने या फोटोंना दिलेल्या कॅप्शननेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'एका वर्षानंतर, तीच जागा, तोच ड्रेस आणि थोडं अधिक प्रेम', अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Photo: Instagram)

4/5 4. 'मुळशी पॅटर्न'मधून मिळाली विशेष ओळख
मालविका गायकवाड हिने 'मुळशी पॅटर्न' चित्रपटात चहावालीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिची भूमिका छोटी असली तरी ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. विशेषतः राहुल्याची मैत्रीण आणि चहाची टपरी चालवणारी मुलगी या भूमिकेमुळे तिला ओळख मिळाली.(Photo: Instagram)

5/5 5. 2020 मध्ये सिद्धार्थसोबत बांधली लग्नगाठ
मालविकाने 2020 मध्ये सिद्धार्थ सिंघवीसोबत लग्न केले. लग्नानंतरही ती अभिनयासोबत सोशल मीडियावर सक्रिय आहे. दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता त्यांच्या आयुष्यात नव्या सदस्याचे आगमन होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. (Photo: Instagram)
Comments
Add Comment

Orry Viral Photo: ऑरीच्या सिग्नेचर पोझवरून नवा वाद; अनन्या पांडेसोबतचा फोटो व्हायरल

Orry Viral Photo: ओरहान अवत्रामणी (ऑरी) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या पोस्ट्स आणि त्याची शैली सोशल मीडियावर

Sapna Choudhary Divorce: सहा वर्षांच्या संसारात दुरावा! सपना चौधरी पती वीर साहूपासून घेणार घटस्फोट

हरियाणवी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय नाव असलेली गायिका आणि डान्सर सपना चौधरी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे

Kaun Banega Crorepati : स्वप्न सत्यात उतरलं! KBC च्या मंचावर भूषण ठाकरे ठरला या सीजनचा पहिला करोडपती

मुंबई :  जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर एखादी व्यक्ती किती मोठे यश मिळवू शकते, याचे उदाहरण जळगावच्या 28 वर्षीय

महागुरु सचिन पिळगावकरांना मानद डॉक्टरेट! ग्वाल्हेरच्या ITM विद्यापीठाकडून गौरव

Sachin Pilgaonkar Doctorate University: मराठी चित्रपटसृष्टीतील महागुरुंचा ग्वालेरमध्ये डॉक्टर ऑफ लिट्रेचर पदवीने गौरव करण्यात आला आहे.

Nitesh Rane : ‘सिरीयल किलर’ नाटकाच्या 100 व्या प्रयोगाला मंत्री नितेश राणे यांची खास उपस्थिती; टीमचे केले कौतुक

मुंबई : मराठी रंगभूमीवरील ‘सिरीयल किलर’ या नाटकाने 100 प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मुंबईतील दादर

गोव्यात IFFI महोत्सवात महाराष्ट्राचे विशेष दालन; चित्रनगरीच्या 50 वर्षांचा गौरव

गोवा: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट