Monday, November 23, 2026

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण बस अपघात; 2 प्रवाशांचा मृत्यू, 30 जण जखमी

समृद्धी महामार्गावर सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक 426 येथे रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. बस चालकाला डुलकी लागल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चार जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती आहे.

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर सावंगी परिसरातील चॅनेल क्रमांक 426 येथे रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. बस चालकाला डुलकी लागल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चार जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास एका झोपेच्या डुलकीने दोन निष्पाप प्रवाशांचा बळी घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी परिसरात चॅनेल क्रमांक ४२६ जवळ चालकाला अचानक झोप लागल्याने वाशिमवरून मुंबईला जाणारी चाणक्य ट्रॅव्हल्सची बस पुलाच्या कठड्यावर आदळून पलटी झाली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर 30 प्रवासी जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

या अपघातात रघुनंदन दत्ता सांगळे वय वर्ष 35, रा. भगतसिंग नगर, मुंबई आणि उत्तम दामू जाधव वय वर्ष 35, रा. पुसद यांचा मृत्यू झाला. तर बसमधील इतर 30 प्रवासी जखमी झाले आहेत, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच फुलंब्री पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी डॉ. सोनाली पाईकराव यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पोहोचून अपघाताची पाहणी केली आणि जखमींना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले.

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झाले असून, यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तब्बल 23 ते 30 जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये 8 ते 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. अशातच यवतमाळहून मुंबईकडे जाणारी खासगी बस पुलाला धडकून पलटी झाली. तर नागपूर कॉरिडॉरवर बोलेरो पिकअप आणि कारचाही अपघात झाला आहे. सुदैवाने अन्य दोन अपघातांमध्ये जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अपघातांनंतर समृद्धी महामार्गावरील बचाव पथक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग चर्चेत आला असून सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

ज्या पुलावर ही बस पलटी झाली, त्याच्या बाजूला अवघ्या काही फुटांवर खोल खाई होती. जर बस कठडा तोडून खाईत कोसळली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती मात्र, बस पुलावरच अडकून पलटी झाल्याने अनेक प्रवाशांचे प्राण वाचले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >