PM Modi gift to Balen Shah : बालेन शाह यांना मोदींची भन्नाट भेट; संपूर्ण रामायण, बनारसी ब्रोकेड आणि गंगाजलाचा नेमका अर्थ काय ?

पंतप्रधान मोदींनी बालेन शाह यांना दिलेली पेंटिंग प्रभू रामाच्या जीवनातील प्रमुख घटनांवर आधारित आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या चित्रकृतीत रामाचा जन्म, वनवास, रावणावर मिळवलेला विजय आणि पुन्हा अयोध्येत परतणे यांसारखे प्रसंग सविस्तर रेखाटण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह सध्या भारत दौऱ्यावर आले असून, सोमवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. या वेळी पंतप्रधान मोदींनी बालेन शाह यांना 'कलमकारी संपूर्ण रामायण' पेंटिंग, 'सदेली' बॉक्समध्ये ठेवलेला बनारसी ब्रोकेड स्टोल आणि 'गंगाजल' भेट दिले. तसेच, भारतातील अयोध्या आणि नेपाळमधील जनकपूर यांना जोडणाऱ्या रेल्वे सेवेला या दोन्ही नेत्यांनी ऑनलाइन पद्धतीने हिरवा कंदील दाखवला.



प्रभू रामाच्या जीवनाचे प्रसंग दाखवणारी पेंटिंग






पंतप्रधान मोदींनी बालेन शाह यांना दिलेली पेंटिंग प्रभू रामाच्या जीवनातील प्रमुख घटनांवर आधारित आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या चित्रकृतीत रामाचा जन्म, वनवास, रावणावर मिळवलेला विजय आणि पुन्हा अयोध्येत परतणे यांसारखे प्रसंग सविस्तर रेखाटण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशातील पारंपरिक 'श्रीकालहस्ती' पद्धतीने कापडावर बांबूच्या लेखणीने आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून ही कलाकृती हाताने साकारली आहे. भारताची कथा सांगण्याची समृद्ध परंपरा, भक्ती आणि पारंपरिक कारागिरी यातून दिसून येते. शिवाय, रामाची अयोध्या आणि माता सीतेचे जन्मस्थळ मानले जाणारे जनकपूर यांच्यातील नात्यातून भारत आणि नेपाळमधील सांस्कृतिक व आध्यात्मिक जवळीक, तसेच दोन्ही देशांची सामायिक मूल्ये आणि मैत्री यातून स्पष्ट होते.



'सदेली' बॉक्समध्ये बनारसी ब्रोकेड स्टोल


याशिवाय पंतप्रधान मोदींनी बालेन शाह यांना 'सदेली' बॉक्समध्ये ठेवून एक बनारसी ब्रोकेड स्टोलही भेट दिला. वाराणसीच्या कुशल कारागिरांनी या रेशमी स्टोलवर बारीक नक्षीकाम आणि चमकदार जरीकाम केले आहे. हा स्टोल ज्या 'सदेली' बॉक्समध्ये ठेवण्यात आला होता, तो गुजराती परंपरेतील असून त्यावर लाकडाचे सुंदर कोरीव काम आणि भूमितीय नक्षी तयार केली आहे.



पितळी कलशात वाराणसीचे गंगाजल


तसेच, पंतप्रधान मोदींनी वाराणसीहून आणलेले गंगाजल एका पितळी कलशात भरून बालेन शाह यांना दिले. काशी विश्वनाथ मंदिराजवळील गंगेचे हे पाणी वाराणसीतील बाबा विश्वनाथ आणि काठमांडूतील भगवान पशुपतिनाथ यांच्यातील आध्यात्मिक नाते दर्शवते; कारण हे दोन्ही भगवान शिवाचेच रूप आहेत. भारत आणि नेपाळमधील खोलवर रुजलेले धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध यातून अधोरेखित होतात, असे सूत्रांनी सांगितले. तसेच यातून दोन्ही देशांमधील पक्की मैत्री अधिक दृढ होऊन शांतता, समृद्धी आणि आध्यात्मिक एकतेचा संदेश दिला गेला आहे.

Comments
Add Comment

कर्नाटकातील शाळांमध्ये मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स; नियम न पाळल्यास कारवाई

कर्नाटक सरकारने शाळकरी मुलींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातील शासकीय, अनुदानित आणि खाजगी

West Bengal Government : पश्चिम बंगालमधील बेरोजगार तरुणांना दरमहा 2,000 रुपयांपर्यंत भत्ता; जानेवारीपासून नव्या योजनेची अंमलबजावणी

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ‘भोरशा

Jama Masjid Police Station Attack : मोठी बातमी : जामा मस्जिद पोलीस ठाण्यात आरोपीचा चाकूने हल्ला; पाच पोलीस जखमी, आरोपीवर गोळीबार

नवी दिल्ली : दिल्लीतील जामा मस्जिद पोलीस ठाण्यामध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने थेट पोलिसांवर

Nitin Nabin Karimnagar Rally : राहुल गांधींच्या आरोपांवर नितीन नबीन यांचा पलटवार; करीमनगरच्या रॅलीतून जोरदार टीका

करीमनगर : मतदानात घोटाळा किंवा चोरी झाल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन

India Nepal relations news : पूरग्रस्त नेपाळला सावरण्यासाठी भारताची २४,००० कोटींची मदत; मोदी-शाह भेटीत ८ महत्त्वाचे करार आणि ६ प्रकल्पांचे लोकार्पण

नवी दिल्ली : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरानंतर तेथील उद्ध्वस्त भागांची पुन्हा उभारणी करण्यासाठी आणि

Nirmala Sitharaman : देशातील सुमारे ५० कोटी नागरिक गरिबीतून बाहेर; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडली गरिबी निर्मूलनाच्या पुढील टप्प्याची दिशा

नवी दिल्ली : भारताने गरिबी निर्मूलनाच्या क्षेत्रात मिळवलेले यश टिकवून ठेवण्यासाठी आता आर्थिक सेवा, बाजारपेठ आणि