
केवळ चेहरा सुंदर आणि चमकदार दिसावा, यासाठी वापरलेली ब्युटी क्रीम एका १७ वर्षीय मुलीच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. केरळमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली असून, संबंधित क्रीमच्या वापरामुळे मुलीच्या किडनीला गंभीर नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात पारा असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी क्रीम तयार करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इन्स्टाग्रामवरील जाहिरात पाहून क्रीमची खरेदी
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील उग्रापुरम येथील १७ वर्षीय मुलीने इन्स्टाग्रामवर 'एफ ट्यून' (F Tune) नावाच्या ब्युटी क्रीमची जाहिरात पाहिली होती. चेहऱ्यावरील मुरुम, डाग आणि डागधब्बे दूर करून त्वचा चमकदार बनवण्याचा दावा या जाहिरातीत करण्यात आला होता. या जाहिरातीला भुलून मुलीने संबंधित क्रीम खरेदी केली आणि तिचा वापर सुरू केला.
मात्र, या क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात पारा असल्याचा आरोप आहे. पारा हा मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असून, त्याच्या संपर्कामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. या क्रीमच्या वापरानंतर मुलीला किडनीच्या समस्येसह इतर आरोग्यविषयक त्रास जाणवू लागले. तिच्या उपचारासाठी जवळपास एक लाख रुपये खर्च झाल्याची माहिती आहे.
आजच्या डिजिटल युगात बँकिंग, ऑनलाइन शॉपिंगपासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत जवळपास सर्वच कामे इंटरनेटच्या माध्यमातून केली जातात. मात्र, ...
कंपनीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. क्रीम तयार करणाऱ्या कंपनीला आरोपी करण्यात आले असून, भारतीय न्याय संहिता, औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा तसेच केरळ पोलीस कायद्यांतर्गत विविध कलमे लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, उत्पादनातील घातक घटकांची माहिती असूनही कंपनीने क्रीममध्ये पाऱ्याचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आरोग्यमंत्र्यांकडून राज्यभर तपासणीचे आदेश
या घटनेची गंभीर दखल घेत केरळचे आरोग्यमंत्री के. मुरलीधरन यांनी राज्यभरातील बनावट सौंदर्यप्रसाधने आणि प्रोटीन पावडरच्या विक्रीची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. परवानगी नसलेली ब्युटी आणि हेल्थ उत्पादने पाकिस्तान तसेच मंगलुरू-कासरगोड परिसरातून येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.






