काय झालं? तिलक वर्माची कृती आणि पंचांची चूक! पाकिस्तानी खेळाडूंचा संताप, मैदानावर थेट पंचांसोबत केला राडा Video

एसीसी पुरूष आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली. हा सामना पाकिस्तानने जिंकला. पण या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू आणि पंचांमध्ये वाद झाला. त्याला कारणीभूत ठरली ती भारताचा कर्णधार तिलक वर्माची कृती..

एसीसी पुरूष आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि पाकिस्तान ए संघात सामना पार पडला. या सामन्यात पाकिस्तानने भारताला 48 धावांनी पराभवाची धूळ चारली. खरं तर शेवटच्या काही षटकात हा सामना भारताच्या बाजूने झुकला होता. पाकिस्तानला सातव्या विकेटसाठी खूपच झुंज द्यावी लागली. त्यामुळे हा सामना हातून जातो की काय? अशी भिती त्यांच्या मनात होती. त्यामुळे शेवटच्या काही षटकात मैदानावर पाकिस्तानी खेळाडूंची नाटकं पाहायला मिळाली. कर्णधार तिलक वर्मा नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या पोझिशनवरून पाकिस्तानी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. हे प्रकरण इतकं तापलं की पाकिस्तानी कर्णधार अब्दुल समद आणि इतर खेळाडू थेट पंचांशी भिडले. हा प्रकार भारताच्या डावातील 44व्या षटकात झाला. तेव्हा पाकिस्तान ए संघाकडून वेगवान गोलंदाज अली रजा ओव्हर द विकेट गोलंदाजी करत होता. स्ट्राईकला शाहबाज अहमद होता, तर नॉन स्ट्रायकर बाजूला तिलक वर्मा उभा होता. तिलक वर्मा गोलंदाजाच्या त्याच बाजूला उभा होता. यासाठी खरं तर पंचांची परवानगी आवश्यक असते.


अली रजाने षटकातील पहिला चेंडू टाकला आणि शाहबाज अहमदन मिड ऑफच्या दिशेने खेळला. या चेंडूवर भारतीय फलंदाजांना काही धाव घेता आली नाही. त्यानंतर पंचांनी तिलक वर्मा चुकीच्या पोझिशनला उभं असल्याचं पाहिलं आणि चेंडू डेड बॉल दिला. त्यामुळे हा चेंडू अली रजाला पुन्हा टाकावा लागणार होता. पंचांच्या या निर्णयामुळे पाकिस्तान खेळाडू नाराज दिसले. कर्णधार अब्दुल समदने बराच वेळ पंचाशी हुज्जत घातली आणि निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कर्णधार तिलक वर्मा पाकिस्तानचा कर्णधार अब्दुल समदकडे गेले आणि त्यांनी आपली बाजू मांडली. काही काळ दोन्ही कर्णधारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच पंचांनी हस्तक्षेप करून खेळाडूंना शांत केले. पण पंचांनी आपला निर्णय काही बदलला नाही आणि रजाला पुन्हा चेंडू टाकावा लागला. त्या चेंडूवर शाहबाज अहमदने एक धाव घेतली.










तिलक वर्मा बाद झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंची अशी कृती


तिलक वर्माची विकेट पडली आणि पाकिस्तानने सामना जिंकला. या विकेटनंतर पाकिस्तानच्या खेळाडूंचं सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिलक वर्मा बाद झाल्यानंतर पाकिस्तानच्या एका खेळाडूने स्टम्प काढली आणि हवेत भिरकावली.






तिलक वर्माचं शतक व्यर्थ


तिलक वर्माने 149 चेंडूत 100 धावांची खेळी केली. त्याने शेवटपर्यंत विजयासाठी झुंज दिली. पण त्याला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला पुढच्या सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. भारताचा पुढचा सामना 24 नोव्हेंबर रोजी युएईशी होणार आहे.


Comments
Add Comment

World Chess Championship 2026: गुकेश की सिंदारोव्ह? बुद्धिबळाच्या पटावर रंगणार दोन युवा चेस मास्टर्सचा महासंग्राम!

आगामी 2026 फिडे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये भारताचा विद्यमान युवा विश्वविजेता डी. गुकेश आणि उझबेकिस्तानचा

न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल संतापला, खेळपट्टीबाबत सरळ म्हणाला की...

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं

WTC Points Table: वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्याने टीम इंडियाचा अंतिम फेरीचा मार्ग खडतर, कसं काय ते जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ड्रॉ

Madhi Cross Country: धावपटूंसाठी पर्वणी! मढी येथे 6 तारखेला क्रॉस कंट्री स्पर्धा रंगणार

अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन, अहिल्यानगर आणि शिवछत्रपती करिअर अकॅडमी पाथर्डी

IND vs NZ सामना ड्रॉ, टीम इंडियाने हातातला सामना गमावला

मुंबई: वेलिंग्टन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जात असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित अर्थात ड्रॉ

भारत-न्यूझीलंड शताब्दी हॉकी मालिकेत भारताचा दणदणीत विजय; अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानंतरही 1-0 ने मारली बाजी

भारतीय पुरुष हॉकी संघाने यजमान न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची ऐतिहासिक 'भारत-न्यूझीलंड शताब्दी क्रीडा