गुकेशच्या कामगिरीकडे लक्ष
जागतिक बुद्धिबळ पटलावर भारताचा डी. गुकेश एक बलाढ्य नाव म्हणून उदयास आला आहे. वयाच्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर किताब पटकावणाऱ्या गुकेशने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. 2022 आणि 2024 च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक सुवर्णपदके जिंकल्यानंतर, त्याने 2024 ची कँडिडेट्स स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रम केला. पुढे सिंगापूर येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद लढतीत चीनच्या डिंग लिरेनचा निर्णायक 14व्या डावात पराभव करत, अवघ्या 18व्या वर्षी तो सर्वात तरुण निर्विवाद क्लासिकल विश्वविजेता ठरला. 2000 मध्ये विश्वनाथन आनंद यांनी मिळवून दिलेल्या पहिल्या विश्वविजेतेपदानंतर भारतीय बुद्धिबळाने मोठी झेप घेतली असून, गुकेशच्या या ऐतिहासिक कामगिरीने जागतिक बुद्धिबळातील भारताचे स्थान अधिक भक्कम केले आहे.
WTC Points Table: वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्याने टीम इंडियाचा अंतिम फेरीचा मार्ग खडतर, कसं काय ते जाणून घ्या
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्याने भारताचं मोठं नुकसान झालं आहे. या ...
सिंदारोव्हचा आत्मविश्वास आणि विजयी फॉर्म
उझबेकिस्तानचा जावोखिर सिंदारोव्ह मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरत आहे. वयाच्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर ठरलेल्या सिंदारोव्हने 2025 चा वर्ल्ड कप आणि 2026ची कॅंडिडेट्स स्पर्धा जिंकून इतिहास रचला. जागतिक अजिंक्यपद लढत खेळणारा तो पहिलाच उझबेक खेळाडू असून, सध्या तो विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, गुकेशला कमी लेखून चालणार नाही; विश्वविजेतेपदाचा अनुभव आणि दबावाखाली खेळण्याची क्षमता हीच गुकेशची खरी ताकद आहे. आतापर्यंतच्या क्लासिकल सामन्यांमध्ये सिंदारोव्हने गुकेशविरुद्ध 2.5-0.5 अशी आघाडी घेतली आहे.मात्र, या आकडेवारीमुळे सामन्याचा निकाल आधीच ठरत नाही. त्यांचे जुने सामने 2018 आणि 2022 मध्ये झाले होते. त्यानंतर दोघांच्याही खेळात मोठी सुधारणा झाली आहे. 2026 मध्ये झालेल्या टाटा स्टील चेस टूर्नामेंटमधील त्यांची लढत अनिर्णित राहिली होती. त्यामुळे यावेळचा सामना अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
एका बाजूला विश्वविजेतेपदाचा अनुभव असलेला गुकेश, तर दुसऱ्या बाजूला सलग मोठ्या स्पर्धा जिंकणारा सिंदारोव्ह, दोघेही युवा आहेत आणि दोघांकडेही इतिहास घडवण्याची संधी आहे. गुकेशने विजय मिळवला, तर तो पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू असल्याचे सिद्ध करेल. तर सिंदारोव्हने बाजी मारली, तर उझबेकिस्तानला पहिला क्लासिकल विश्वविजेता मिळेल.