येत्या गुरुवारी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांत घेतला जाणार 24 तासांचा पाणीब्लॉक, कोणकोणत्या परिसरात बंद असेल पाणी पुरवठा

पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक 1 ते सहार गाव दरम्यान मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने गुरुवार, 26 नोव्हेंबर सकाळी 9 ते शुक्रवार, 27 नोव्हेंबर सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांचा पाणीब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत दादर-धारावी, अंधेरी-जोगेश्वरी, वांद्रे-सांताक्रूझ आणि विक्रोळी-भांडुप पट्ट्यातील अनेक भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद किंवा कमी दाबाने राहील.

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक 1 ते सहार गाव दरम्यान विविध ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात येणार आहे. हे दुरूस्‍ती काम गुरुवारी 26 नोव्‍हेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता सुरु करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी म्‍हणजेच, शुक्रवारी 27 नोव्‍हेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता दुरूस्‍ती कार्यवाही पूर्ण होणे अपेक्षित आहे. या 24 तासांच्‍या कालावधीत दादर ते धारावी (जी उत्तर), विलेपार्ले ते अंधेरी पूर्व (के दक्षिण), अंधेरी ते जोगेश्वरी पूर्व (के उत्तर), वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व (एच पूर्व) आणि विक्रोळी ते भांडुप या (एस) या विभागातील काही परिसरांत पाणीपुरवठा खंडित राहील. तसेच के दक्षिण, एस व एन या विभागातील काही परिसरांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.






या कालावधीत नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून वापरावे. तसेच, गळती दुरूस्‍ती कार्यवाहीनंतर पुढील तीन ते चार दिवस कमी दाबाने व गढूळ पाणी पाणीपुरवळा होण्‍याची शक्‍यता आहे. खबरदारीचा उपाय म्‍हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्‍यावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे नम्र आवाहन करण्‍यात येत आहे.



जी उत्तर विभाग



  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 - धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर, प्रेम नगर, नाईक नगर (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 - धारावी मुख्‍य रस्‍ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जास्मिन मिल मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर, कुंभारवाडा (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

  • शुक्रवार, 27 नोव्‍हेंबर 2026 - जास्मिन मिल मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, 60 फुटी रस्‍ता, 90 फुटी रस्‍ता, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर धोरवडा, महात्‍मा गांधी मार्ग (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)






के दक्षिण व के उत्तर विभाग



  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 - विजय नगर मरोळ, मिलिटरी मार्ग, वसंत ओअॅसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 - सेव्हेन हिल्स रुग्‍णालय, आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिप्झ (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 - मुलगाव डोंगरी, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक 1 ते 23, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज, सारीपुत नगर (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 - चकाला, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी क्रमांक 1 व 2, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्‍णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदि‍रा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटापाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 - कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ वसाहत, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी. अँड टी. वसाहत (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 - कोलडोंगरी, जुनी पोलीस गल्‍ली, विजय नगर (सहार मार्ग), मोगरपाडा (कमी दाबाने पाणीपुरवठा)

  • शुक्रवार, 27 नोव्‍हेंबर 2026 - ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक क्षेत्र), सहार गाव, सुतारपाखाडी (पाईपलाईन क्षेत्र), कार्गो संकुल (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)






एच पूर्व विभाग



  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 ते शुक्रवार, दिनांक 27 नोव्‍हेंबर 2026 – वांद्रे टर्मिनस (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

  • शुक्रवार, 27 नोव्‍हेंबर 2026 - ए. के. मार्ग, खेरवाडी सर्व्हिस रोड, बेहरामपाडा, खेरनगर, निर्मल नगर, वांद्रे (पूर्व) (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)


एस विभाग



  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 – विक्रोळी (पश्चिम), कांजूरमार्ग (पश्चिम), सूर्या नगर, आंबेडकर चौक, लाल बहादूर शास्‍त्री मार्ग, सनसिटी संकुल (पाणीपुरवठा कमी दाबाने होईल)

  • शुक्रवार, 27 नोव्‍हेंबर 2026 - भांडुप (पश्चिम) - महाराष्ट्र नगर, कोकण नगर, समर्थ नगर, काजु टेकडी, क्वॉरी मार्ग, जमील नगर, उत्कर्ष नगर, साई हिल, साई विहार, टेंभीपाडा, भट्टीपाडा, टँक मार्ग, जनता बाजार, लेक मार्ग, तुळशेतपाडा, गाव मार्ग, दत्त मंदिर मार्ग, शास्त्री नगर, सोनापूर (कमी दाबाने पाणीपुरवठा)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 ते शुक्रवार, दिनांक 27 नोव्‍हेंबर 2026 – मोरारजी नगर, गौतम नगर, जय भीम नगर, पासपोली गाव, कैलास नगर (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 ते शुक्रवार, दिनांक 27 नोव्‍हेंबर 2026 – बेस्ट नगर, फिल्टरपाडा, गावदेवी, स्काऊट गाईड, बृहन्‍मुंबई महानगरपालिका कर्मचारी वसाहत, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, आरे मार्ग (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 ते शुक्रवार, दिनांक 27 नोव्‍हेंबर 2026 – भांडुप (पश्चिम) – श्रीरामपाडा, त्रिमूर्ती नगर, आंब्याची भरणी, वाघोबा वाडी, तानाजी वाडी, नरदास नगर, शिवाजी नगर (कमी दाबाने पाणीपुरवठा)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 - तानाजीवाडी, चाफ्याचा पाडा, डक्ट लाईन मार्ग (कमी दाबाने पाणीपुरवठा)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 – रामनगर (कमी दाबाने पाणीपुरवठा)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 – साई हिल, साई विहार (कमी दाबाने पाणीपुरवठा)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 – रमाबाई नगर (कमी दाबाने पाणीपुरवठा)

  • शुक्रवार, 27 नोव्‍हेंबर 2026 - हनुमान नगर, पानसरे कुंपण, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, फुले नगर, मुत्तू कुंपण (कमी दाबाने पाणीपुरवठा)






एन विभाग



  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 - अप्पर डेपो पाडा, लोअर डेपो पाडा, सागर नगर, महानगरपालिका इमारत विभाग (कमी दाबाने पाणीपुरवठा)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 - विक्रोळी पश्चिम रेल्वे स्टेशन मार्ग, फिरोजशाह नगर, गोदरेज कुंपण (कमी दाबाने पाणीपुरवठा)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 - मेफेअर इमारती, कैलाश संकुल (कमी दाबाने पाणीपुरवठा)

  • गुरुवार, 26 नोव्‍हेंबर 2026 - वाधवा निवासी, प्रेसिडेंशियल टॉवर्स, कल्पतरू संकुल, आर-सिटी मॉल, ऑर्किड्स इमारती, दामोदर पार्क, पंकेश बाबा दर्गा, उद्यान गल्‍ली, संघानी इस्टेट, श्रेयस सिनेमा, साईनाथ नगर, नित्यानंद नगर (कमी दाबाने पाणीपुरवठा)

Comments
Add Comment

Safe Parks Safe Cities: उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागांची सुरक्षा वाढवणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): कुर्ला येथील उद्यानानातील तरुण तरुणीला काही अल्पवयीय मुलांकडून झालेल्या मारहाणीच्या

Mumbai Local News : प्रवाशांचा थरकाप: झोपमोड झाल्याचा राग अनावर; प्रवाशाने केसांत लपवलेल्या ब्लेडने केला स्वतःवर हल्ला

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना घडली

Nitesh Rane : मदरसे म्हणजे दहशतवादी घडवणारे अड्डे! मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

कुर्ला मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मदरशांवर बंदीची मागणी मुंबई : कुर्ला येथे एका तरुण-तरुणीला झालेल्या

Kurla Crime: कुर्ल्यातील महाजन उद्यानात तरुण तरुणीला अल्पवयीन टोळक्याकडून झालेल्या मारहाणीची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडून दखल

मुंबई: मुंबईतील कुर्ल्यातील महाजन उद्यानामध्ये एका जोडप्याला अल्पवयीन टोळक्यांकडून मारहाण झाल्याचा प्रकार

CSR Fund Scam: सीएसआर निधीच्या नावाखाली कोटींचा कथित गैरव्यवहार; धर्मेंद्र सिंहला अटक

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सुमारे 200 कोटी रुपयांच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जुहू परिसरात

FDA Mumbai: मुंबईत अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; विद्यापीठ कॅन्टीनसह 6 आस्थापनांवर कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर धडक कारवाई