कसोटीत प्रतिस्पर्ध्यांना 100 धावांच्या आत सर्वाधिक वेळा ऑल-आऊट करण्याचा विश्वविक्रम कोणाच्या नावावर? जाणून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमुळे गेल्या काही वर्षात कसोटीचं महत्त्व वाढलं आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. असं असताना एका विक्रमाची चर्चा होत आहे. कसोटीत प्रतिस्पर्धी संघाला 100 धावांच्या आत गुंडाळणारा संघ कोणता? चला जाणून घेऊयात..

1/5 क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम रचले आणि मोडले गेलेत. त्यामुळे प्रत्येक विक्रमाची चर्चा होत असते. दक्षिण अफ्रिका बांगलादेश कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याची अशीच चर्चा आहे. कारण दक्षिण अफ्रिकेने बांगलादेशला 91 धावांवर गुंडाळलं. प्रतिस्पर्धी संघाला 100 धावांच्या आत गुंडाळण्याची ही दक्षिण अफ्रिकेची ही 24वी वेळ आहे. (Photo: Proteas Cricket Twitter)

2/5 दक्षिण अफ्रिकेने 24व्यांदा ही कामगिरी केली असली तरी कसोटीत हा विक्रम कोणाच्या नावावर आहे? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. वर्ल्ड रेकॉर्डनुसार इंग्लंडच्या नावावर हा विक्रम आहे. इंग्लंडने प्रतिस्पर्धी संघाला कसोटीत 86वेळा 100 धावांच्या आत गुंडाळलं आहे. (Photo: Proteas Cricket Twitter)

3/5 ऑस्ट्रेलियाने कसोटी अशी कामगिरी 57 वेळा केली आहे आणि या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण अफ्रिकेचा क्रमांक लागतो. 24 वेळा अशी कामगिरी करून तिसरं स्थान गाठलं आहे. (Photo: ANI)

4/5 आशियाई देशात प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा 100 धावांच्या आत गुंडाळण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. पाकिस्तानने अशी कामगिरी 17वेळा केली आहे. म्हणजेच आशियाई देशांमध्ये पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे. (Photo: ICC)

5/5 भारतीय संघ या यादीत कितव्या स्थानावर आहे हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे. पाकिस्ताननंतर या यादीत भारताचा क्रमांक लागतो. भारताने प्रतिस्पर्धी संघाला 11वेळा 100 धावांच्या आत गुंडाळलं आहे. (Photo: ICC)

 
Comments
Add Comment

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर शुभमन गिलने ठेवलेला प्रस्ताव आयसीसीने फेटाळला, असं कारण दिलं की...

भारत न्यूझीलंड कसोटी मालिका सुरू असून पहिला सामना अनिर्णित ठरला. पहिल्या सामन्यात भारताने 720 धावांचा डोंगर रचला

वेलिंग्टन कसोटीत ड्रॉ? अश्विनचा संताप शिगेला! शुभमन गिलच्या निर्णयावर थेट हल्ला, कोहलीची आठवण काढत म्हणाला...

India vs New Zealand : वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या 5 व्या दिवशी भारताने अनपेक्षितपणे

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या बांगलादेश संघाची कसोटी मालिकेतील सुरुवात पराभवाने झाली असली, तरी आता त्यांनी

IND vs NZ, 2nd Test: टीम इंडियाचा विजय सोपा होणार? न्यूझीलंडचा घातक गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर दुसऱ्या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा

India vs UAE Live Streaming: आशिया कप रायझिंग स्टार्ग स्पर्धेत भारत युएई सामना, कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने आता रंजक वळणावर आले आहे. गट अ मधून श्रीलंका आणि

ऐतिहासिक विजय! अलेक्झांडर झ्वेरेव्हला धूळ चारत कार्लोस अल्काराजने पटकावले पहिले एटीपी फायनल्स विजेतेपद

[caption id="attachment_1078268" align="aligncenter" width="800"] स्पॅनिश टेनिस स्टार कार्लोस अल्कारजने पहिल्यांदाच एटीपी फायनल्सचे विजेतेपद पटकावले