Nashik Crime : आजार बरा करण्यासह घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष अन्..., भोंदूबाबा अरुण पाटीलला अटक

Nashik Crime : घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासह घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलेची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. अस्थम्याचा आजार बरा करण्याचे आश्वासन देत जादूटोण्याच्या नावाखाली अघोरी पूजा करून त्याने महिलेची आर्थिक फसवणूक केली होती. अरुण धोंडू पाटील (वय ४८, रा. ध्रुवनगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.



नेमकं प्रकरण काय ?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२२ ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संशयित अरुण पाटील याने फिर्यादी महिलेला अस्थम्याचा आजार बरा करण्याचे तसेच घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी जादूटोण्याच्या नावाखाली अघोरी पूजा आणि विविध विधी केल्याचा बनाव केला. या माध्यमातून त्याने महिलेकडून तब्बल सात लाख ५० हजार रुपये उकळले.


या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२), ३१८ (४) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ च्या कलम ३ आणि ३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार होता.






भोंदूबाबा अरुण पाटीलला अटक


दरम्यान, संशयित अरुण पाटील हा म्हसरूळ वस्ती परिसरात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा, आंबड युनिट-३ च्या पोलीस पथकाला मिळाली. पोलीस अंमलदार गौरव धात्रक, महेंद्र दोंदे आणि राजेश महाले यांनी ही माहिती दिल्यानंतर प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या पथकाने सापळा रचला. २३ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास शेत परिसरातून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.


ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Comments
Add Comment

उत्तर प्रदेशात शिवसेनेची 35 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी, भाजपसोबत युती करण्याचे प्रयत्न

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील

ऐकावं ते नवलंच ! चक्क हाडांपासून बनवले कानातले, पुढे नेकलेसही बनवणार ; महिलेची अनोखी कल्पना पाहून नेटकरी थक्क

दागिने म्हटलं की सोनं, चांदी, हिरे आणि मोती हेच डोळ्यांसमोर येतात. पण एखाद्याने स्वतःच्याच शरीरातील हाडांपासून

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नगरसोल-तारूर मार्गावर 16 दिवसांचा ब्लॉक; अनेक गाड्या रद्द

कसोटीत प्रतिस्पर्ध्यांना 100 धावांच्या आत सर्वाधिक वेळा ऑल-आऊट करण्याचा विश्वविक्रम कोणाच्या नावावर? जाणून घ्या

[caption id="attachment_1078646" align="aligncenter" width="800"] क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम रचले आणि मोडले गेलेत. त्यामुळे प्रत्येक विक्रमाची चर्चा

Shahid Kapoor : शाहिद कपूरने खरेदी केली नवी Land Rover Defender OCTA कार; किंमत 3 कोटी रुपये

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पुन्हा एकदा आपल्या लक्झरी कारच्या खरेदीमुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकतीच Land Rover

BHEL Recruitment: इंजिनिअर्ससाठी सरकारी नोकरीची संधी! BHEL मध्ये 200 पदांची भरती

इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी भारत सरकारच्या नामांकित सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत नोकरीची मोठी