Shahid Kapoor : शाहिद कपूरने खरेदी केली नवी Land Rover Defender OCTA कार; किंमत 3 कोटी रुपये

डिफेंडरच्या सर्वाधिक शक्तिशाली आणि प्रीमियम मॉडेल्सपैकी एक असलेल्या या SUV मध्ये दमदार इंजिन, आधुनिक तंत्रज्ञान आणि ऑफ-रोड ड्रायव्हिंगची क्षमता आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पुन्हा एकदा आपल्या लक्झरी कारच्या खरेदीमुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकतीच Land Rover Defender 110 OCTA ही दमदार SUV खरेदी केल्याचे वृत्त समोर आले आहे. या गाडीची मुंबईतील ऑन-रोड किंमत सुमारे 3.04 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. डिफेंडरच्या सर्वाधिक शक्तिशाली आणि प्रीमियम मॉडेल्सपैकी एक असलेल्या या SUV मध्ये दमदार इंजिन, आधुनिक तंत्रज्ञान आणि ऑफ-रोड ड्रायव्हिंगची क्षमता आहे.





सोशल मीडियावरून खरेदीची माहिती समोर


ओम लोम्बार्ड यांनी सोशल मीडियावर शाहिद कपूरचे या नवीन गाडीसोबतचे फोटो शेअर केले. या पोस्टमधून शाहिदचे Defender OCTA क्लबमध्ये स्वागत करण्यात आले. पोस्टमध्ये त्याच्या 'कबीर सिंग' आणि 'फर्जी' या लोकप्रिय भूमिकांचा उल्लेख करत गाडीच्या ताकद आणि कामगिरीशी त्यांची तुलना करण्यात आली.

Defender 110 OCTA ची खास वैशिष्ट्ये


Land Rover Defender 110 OCTA ही कंपनीच्या डिफेंडर श्रेणीतील उच्च-कार्यक्षमतेची SUV आहे. यामध्ये शक्तिशाली V8 इंजिन देण्यात आले आहे. दमदार वेगासोबतच कठीण रस्त्यांवर आणि ऑफ-रोड परिस्थितीत गाडी चालवण्यासाठी आवश्यक क्षमता या मॉडेलमध्ये आहे. मजबूत बांधणी, आधुनिक सुविधा आणि लक्झरी इंटिरियरमुळे ही SUV विशेष मानली जाते.

भारतात किती आहे किंमत?




भारतीय बाजारपेठेत Land Rover Defender 110 OCTA ची एक्स-शोरूम किंमत व्हेरिएंटनुसार अंदाजे 2.42 कोटी ते 2.62 कोटी रुपये आहे. मुंबईत कर, विमा आणि इतर शुल्कांचा समावेश केल्यानंतर तिची ऑन-रोड किंमत सुमारे 3.04 कोटी रुपये होऊ शकते. त्यामुळे शाहिदच्या कार कलेक्शनमधील ही एक महागडी भर ठरली आहे.

'कॉकटेल 2' मुळेही शाहिद चर्चेत


कामाच्या आघाडीवर शाहिद कपूर आगामी 'कॉकटेल 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित या चित्रपटात त्याच्यासोबत कृती सॅनॉन आणि रश्मिका मंदाना यांच्या भूमिका आहेत. हा 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कॉकटेल' चित्रपटाचा पुढचा भाग आहे.

 
Comments
Add Comment

IMDb Trending: रावणापेक्षाही कुंभकर्णाची चर्चा! IMDb च्या यादीत फैसल मलिक अव्वल

भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू

Panchayat 5 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, रिंकु आणि सचिवची लव्हस्टोरी बहरणार; 'फुलेरा'तील स्थानिक राजकारण बदलणार

मुंबई: बहुप्रतिक्षित 'पंचायत'च्या पाचव्या सीझनचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. येत्या 3 डिसेंबर 2026 रोजी,

Parastoo Ahmadi 74 lashes: प्रसिद्ध इराणी गायिकेला 74 चाबकाचे फटके, हिजाब न घालता गाणं गायल्यामुळे देण्यात आली शिक्षा

मुंबई: इराणमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि महिलांच्या स्वातंत्र्यावरून पुन्हा एकदा मोठा वाद उफाळून आला आहे.

Shraddha kapoor Shreya Ghoshal viral video : श्रेया घोषालच्या बंगळुरू कॉन्सर्टमध्ये श्रद्धा कपूरची खास हजेरी; 'आशिकी २'पासून 'ईठा'पर्यंतच्या आठवणींना उजाळा

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) हिच्या बंगळुरू येथील लाईव्ह कार्यक्रमात अभिनेत्री श्रद्धा कपूर

Pratap Movie: 'स्वतःची ओळख कधीही गमावू नका'; ईशा देओलचा तरुणांना संदेश

मुंबई: आगामी 'प्रताप' चित्रपटाच्या प्रोमोशन निमित्ताने अभिनेत्री ईशा देओल, अभिनेता अमित साध आणि चित्रपट

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीसाठी स्वतंत्र यंत्रणा; कमी बजेटच्या सिनेमांसाठीही नवा प्लॅन

गोवा: गोवा येथे 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु आहे. या चित्रपट महोत्सवात अनेक कार्यक्रमांची