Honda CB500 भारतात लॉन्च ! 501cc इंजिनसह तीन व्हेरिएंट्स ; Royal Enfield ला देणार टक्कर, किंमत फक्त...

भारतीय बाजारपेठेत होंडाकडून सादर करण्यात आलेली ही सर्वात मोठी एअर कूल्ड सिंगल सिलेंडर बाइक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

भारतीय दुचाकी बाजारपेठेत आता पुन्हा एकदा 500cc इंजिन क्षमतेच्या बाइक्सची चर्चा रंगू लागली आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India) ने आपली नवीन Honda CB500 बाइक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. दमदार 501cc इंजिन, आकर्षक लूक आणि आधुनिक फीचर्ससह ही बाइक तीन वेगवेगळ्या व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 2020 मध्ये रॉयल एनफिल्डने आपले 500cc मॉडेल्स बंद केल्यानंतर या सेगमेंटमध्ये फारशी हालचाल पाहायला मिळाली नव्हती. अशातच होंडाच्या नव्या बाइकच्या एंट्रीमुळे या सेगमेंटमध्ये पुन्हा चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.



501cc इंजिनमुळे बाइकची ताकद वाढणार


Honda CB500 मध्ये 501cc क्षमतेचे एअर आणि ऑइल कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5,250 rpm वर 28 hp पॉवर, तर 3,750 rpm वर 43.3 Nm टॉर्क निर्माण करते. भारतीय बाजारपेठेत होंडाकडून सादर करण्यात आलेली ही सर्वात मोठी एअर कूल्ड सिंगल सिलेंडर बाइक असल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीने या बाइकच्या बुकिंगला सुरुवात केली असून, 2026 च्या अखेरपर्यंत ग्राहकांना डिलिव्हरी देण्याचे नियोजन आहे.



Honda CB500 चे तीन व्हेरिएंट्स


होंडाने ग्राहकांच्या आवडीनुसार CB500 चे तीन व्हेरिएंट्स बाजारात आणले आहेत. यामध्ये Alloy, Spoke आणि टॉप व्हेरिएंटचा समावेश आहे.


Alloy व्हेरिएंट : 2.75 लाख रुपये. यामध्ये Pearl Igneous Black आणि Pearl Deep Ground Gray हे रंग उपलब्ध आहेत.


Spoke व्हेरिएंट : 3 लाख रुपये. यामध्ये क्रॉस-स्पोक ट्यूबलेस रिम्स देण्यात आले आहेत.


टॉप व्हेरिएंट : 3.02 लाख रुपये. यामध्ये स्पोक व्हील्ससह खास रंगसंगती आणि ग्राफिक्स मिळतात.


मिड व्हेरिएंट Rebel Red Metallic आणि Matt Steel Silver Metallic या रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर टॉप मॉडेल Pearl Igneous Black रंगात आकर्षक स्ट्राइप्ससह सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तिन्ही व्हेरिएंट्समध्ये Honda Selectable Torque Control (HSTC), अ‍ॅनालॉग आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल तसेच Honda RoadSync कनेक्टिव्हिटी यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.






189 किलो वजन, ड्युअल चॅनेल ABSसह अनेक फीचर्स


Honda CB500 मध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला असून, त्यासोबत स्लिप आणि असिस्ट क्लचची सुविधाही आहे. बाइकच्या पुढील बाजूला 19 इंच आणि मागील बाजूला 17 इंचाचे व्हील्स मिळतात. सुरक्षित ब्रेकिंगसाठी दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनेल ABS देण्यात आले आहे. सस्पेंशनसाठी पुढे टेलिस्कोपिक फोर्क्स, तर मागील बाजूला प्रीलोड अॅडजस्टेबल गॅस चार्ज्ड ट्विन शॉक अॅब्झॉर्बर्स देण्यात आले आहेत. या बाइकचे एकूण वजन 189 किलो असून, ग्राउंड क्लीअरन्स 168 मिमी आहे.


वजनाच्या बाबतीत तुलना करायची झाल्यास Honda CB350 चे वजन 181 किलो, तर Royal Enfield Classic 350 चे वजन 195 किलो आहे. त्यामुळे CB500 ही या दोन्ही बाइक्सच्या वजनाच्या मधल्या श्रेणीत येते. एकूणच, दमदार इंजिन क्षमता, आधुनिक फीचर्स आणि तीन व्हेरिएंट्समुळे Honda CB500 भारतीय बाजारपेठेत कितपत लोकप्रिय ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः 500cc सेगमेंटमध्ये बाइक खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक नवा पर्याय ठरू शकतो.

Comments
Add Comment

Ahilyanagar Football Super League : अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग; एक्सलन्स अचिव्हर्सला टायब्रेकरमध्ये नमवत पटकाविले विजेतेपद

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : मैदानावरील आक्रमक खेळ, गोल करण्यासाठी खेळाडूंमध्ये सुरू असलेली चढाओढ आणि प्रेक्षकांचा

द्विशतक, षटकार आणि बरंच काही..! आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीकडू विक्रमाचा पाऊस

[caption id="attachment_1078717" align="aligncenter" width="800"] आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या वादळापुढे युएईने गुडघे टेकले.

Bhiwandi News : धक्कादायक! शोरमा खाल्ल्याने 17 जणांना विषबाधा; लहान मुलांचाही समावेश, रुग्णालयात उपचार सुरू

ठाणे : भिवंडी शहरात शोरमा खाल्ल्यानंतर 17 जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. वंजारपट्टी नाका परिसरातील

Fairness Cream : 'या' क्रीमचा भयंकर साईड इफेक्ट! क्रीममध्ये सापडला पारा, 17 वर्षांच्या मुलीची किडनी धोक्यात

केरळ : गोरे दिसण्याच्या हव्यासापोटी सोशल मीडियावरील जाहिरातींना भुलून फेअरनेस क्रीम वापरणे किती धोकादायक ठरू

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6...! वैभव सूर्यवंशीने अवघ्या 28 चेंडूत ठोकलं शतक, असा नोंदवला विक्रम

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारताचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची बॅट काही चालली नव्हती. नेपाळ

Nashik : नाशिक तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश होणार ? छगन भुजबळांच्या आदेशानंतर प्रशासनाचा शासनाकडे प्रस्ताव

नाशिक : नाशिक तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत दिलासा मिळावा, तसेच