पुणे: 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 28 जानेवारी 2027 ते 31 डिसेंबर 2027 दरम्यान पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापिठामध्ये रंगणार आहे. या साहित्य संमेलनाच्या मंहामंडळाची पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये, आज अध्यक्षांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. पुण्यात पार पडलेल्या साहित्य महामंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले. या निवडीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
Nashik News : काळजाचा ठोका चुकवणारा क्षण ! बोअरवेल मध्ये पडलेल्या चिमुकल्या शंभुची 45 मिनीटात सुखरूप सुटका , ग्रामस्थांच्या धाडसामुळे थोडक्यात बचावले प्राण
Nashik News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळता खेळता अवघ्या दोन वर्षांचा चिमुकला तब्बल २०० फूट खोल बोरवेलमध्ये पडला. ही घटना समजताच ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शंभरावे पर्व हे मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानले जाते. अशा ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक मान्यवरांची नावे चर्चेत होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात शरणकुमार लिंबाळे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर राहिले आणि निवड समितीने तसेच साहित्य महामंडळाच्या घटक संस्था आणि साहित्य परिषदेने त्यांच्या नावावर एकमताने पसंती दर्शवली. विशेष म्हणजे, यंदा अध्यक्षपदाची निवड कोणत्याही निवडणुकीशिवाय पार पडली आहे.या निवडीमागे एक वेगळी पार्श्वभूमीही आहे. काही वर्षांपूर्वी शरणकुमार लिंबाळे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळावे यासाठी प्रयत्न केले होते; परंतु त्या वेळी त्यांना यश आले नव्हते. मात्र, चिकाटी आणि साहित्यिक योगदानाच्या जोरावर आता शंभराव्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले आहे.
पेपरफुटीप्रकरणी १० कोटींचा दंड, १० वर्षांपर्यंत कारावासाची शिफारस
मुंबई : राज्यातील भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी तसेच अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची शिफारस उच्चस्तरीय ...
अनेक नावांच्या चर्चांमध्ये अखेर त्यांच्या नावावर झालेला निर्णय साहित्य क्षेत्रात लक्षवेधी ठरला आहे. शरणकुमार लिंबाळे यांची ओळख प्रामुख्याने एक महत्त्वपूर्ण दलित साहित्यिक म्हणून असली, तरी त्यांचे लेखन या चौकटीच्या पलीकडे जाऊन विस्तारलेले आहे. त्यांच्या साहित्यातील अनुभवविश्व, सामाजिक जाणिवा आणि मांडणीची ताकद यामुळे त्यांच्या लिखाणाला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशपातळीवरही मोठी मान्यता मिळाली आहे. मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना विविध स्तरांवर ओळख आणि सन्मान प्राप्त झाला आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्याच्या प्रवासावर, नव्या पिढीच्या लेखनावर आणि समाजातील बदलत्या वास्तवावर व्यापक चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांच्या संमतीने झालेल्या या निवडीमुळे संमेलनाच्या तयारीला आता अधिक गती मिळणार आहे. पूर्वीच्या अपयशानंतर मिळालेले हे अध्यक्षपद आणि निवडणुकीविना झालेली निवड या दोन्ही बाबींमुळे शरणकुमार लिंबाळे यांची ही निवड मराठी साहित्य वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.