Nashik News : काळजाचा ठोका चुकवणारा क्षण ! बोअरवेल मध्ये पडलेल्या चिमुकल्या शंभुची 45 मिनीटात सुखरूप सुटका , ग्रामस्थांच्या धाडसामुळे थोडक्यात बचावले प्राण

Nashik News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खेळता खेळता अवघ्या दोन वर्षांचा चिमुकला तब्बल २०० फूट खोल बोरवेलमध्ये पडला. ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, संकटाच्या या प्रसंगी ग्रामस्थांनी दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधान चिमुकल्यासाठी जीवनदायी ठरले. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच ग्रामस्थांनी बचावकार्य हाती घेत चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढले. ही घटना चांदवड तालुक्यातील जोपुळ येथे घडली आहे.



नेमकी घटना काय ?


खेळता खेळता २०० फूट खोल बोअरवेलमध्ये कोसळलेल्या तीन वर्षीय चिमुकल्या शंभू दाते याला अवघ्या ४५ मिनिटांत सुखरूप बाहेर काढत ग्रामस्थांनी 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा जिवंत प्रत्यय दिला. जोपुळ येथे शनिवारी सायंकाळी घडलेल्या या थरारक घटनेने अवघा परिसर काही काळ सुन्न झाला होता, मात्र चिमुकला सुखरूप हाती आल्यानंतर आनंदाचे अश्रू आणि कृतज्ञतेची भावना दाटून आली.​ जोपुळ-नारायणगाव रस्त्यालगत असलेल्या रामहरी कारभारी वाघ यांच्या शेतातील गट क्रमांक २६ मधील बोअरवेलमध्ये शंभू दत्तू दाते (वय ३) हा सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता पडला. सुदैवाने तो तळाशी न जाता केवळ पाच फूट खोलीवर अडकला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले आणि काळजावर दगड ठेवून बचावकार्य सुरू झाले.







...आणि माणुसकीचा विजय


​दिगंबर वाघ आणि ग्रामस्थ दत्तात्रय पिंपरकर राहुल वाघ व चेतन जाधव यांनी क्षणाचाही विलंब न लावता दोरीच्या साहाय्याने चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी जीवाचे रान केले. सायंकाळी ६.३० वाजता चिमुकल्याला सुरक्षित बाहेर काढताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि डोळ्यांतील आनंदाश्रूंनी धाडसी सुटकेचे स्वागत केले.


बालकाला पुढील उपचारासाठी वडाळीभोई येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तहसीलदार अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन पथक आणि वडनेरभैरव पोलिसांनीही तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली.​ स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका निष्पाप चिमुकल्यासाठी धावून जाणाऱ्या दिगंबर वाघ आणि दत्तात्रय पिंपरकर यांच्यासह सर्वच गावातील तरुणांच्या धाडसाचे जोपुळसह संपूर्ण चांदवड तालुक्यातून मनापासून कौतुक होत आहे.



पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांचा सन्मान


या संपूर्ण बचावकार्याची दखल पोलीस प्रशासनानेही घेतली. मालेगावचे पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम, पोलीस अधिकारी अमोल पवार तसेच वडनेर भैरव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी चिमुकल्याचे प्राण वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामस्थांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


दरम्यान, अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्यावर ओढवलेले संकट ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे टळले. त्यांच्या धाडसाचे आणि माणुसकीचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

Comments
Add Comment

वेलिंग्टन कसोटीत ड्रॉ? अश्विनचा संताप शिगेला! शुभमन गिलच्या निर्णयावर थेट हल्ला, कोहलीची आठवण काढत म्हणाला...

India vs New Zealand : वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या 5 व्या दिवशी भारताने अनपेक्षितपणे

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या बांगलादेश संघाची कसोटी मालिकेतील सुरुवात पराभवाने झाली असली, तरी आता त्यांनी

BJP Akali Dal Alliance : 6 वर्षांचा दुरावा संपला! भाजप-अकाली दल पुन्हा एकत्र; 2020 मध्ये का तुटली होती युती?

भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दल यांनी आज (२४ नोव्हेंबर) २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची

Mission Pedestrian First: महापालिका आयुक्तांच्या ‘मिशन पेडेस्ट्रियन फर्स्ट’लाच अधिकारीच घालतात खिळ?

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पदपथावरील अतिक्रमण हटवले जाते, पादचारी मुक्त झाले पदपथ बनवले जातात, पण काही दिवसांतच

Gurpurab food recipes : कडा प्रसादाशिवाय 'या' चविष्ट पदार्थांनी वाढवा गुरुपर्व सणाची रंगत; जाणून घ्या पंजाबी खाद्यसंस्कृतीची खासियत

मुंबई : शीख धर्मात 'गुरुपर्व' या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कीर्तन, नगरकीर्तन आणि गुरुद्वारातील लंगर यांसोबतच

IND vs NZ, 2nd Test: टीम इंडियाचा विजय सोपा होणार? न्यूझीलंडचा घातक गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर दुसऱ्या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा