सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसर आणि पंढरपूर भागातील मच्छीमारांसाठी आधुनिक मत्स्य बाजार उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उजनी धरणाजवळील प्रेमनगर, पंढरपूर आणि पंढरपूर-माळशिरस सीमेवरील बंधाऱ्यालगत अशा 3 ठिकाणी मत्स्य बाजार उभारण्याचे प्रस्ताव महिनाभरात सादर करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत या प्रस्तावांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
यासंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार अभिजित पाटील, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, सोलापूरचे जिल्हाधिकारी ऑनलाइन पद्धतीने तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
26/11 Mumbai Terror Attack : 18 वर्षांनंतरही ती काळरात्र विसरता येत नाही! 26/11 हल्ल्यातील न ऐकलेले किस्से आणि शहीदांच्या आठवणी
मुंबई : 26 नोव्हेंबर 2008... मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस! समुद्रमार्गे आलेल्या 10 दहशतवाद्यांनी संपूर्ण मुंबईला वेठीस धरले होते. गोळीबार, बॉम्बस्फोट आणि ...
तीन ठिकाणी मत्स्य बाजार उभारण्याचे नियोजन
उजनी धरणाच्या भिंतीजवळील प्रेमनगर परिसरात सोलापूर-पुणे महामार्गालगत सध्या मासळीची विक्री केली जाते. या ठिकाणी स्वतंत्र बाजार उभारल्यास स्थानिक मच्छीमार आणि विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. पंढरपूरमध्ये चंद्रभागा मत्स्यमारी संस्थेने भाडेतत्त्वावरील मर्यादित जागेत बाजार सुरू केला आहे. येथे सुमारे 200 ते 225 मच्छीमारांना वेगवेगळ्या दिवशी गटागटाने व्यवसाय करावा लागतो. पंढरपूर-माळशिरस सीaमेवरील बंधाऱ्यालगतही अनेक मच्छीमार कुटुंबे मासेमारी आणि विक्रीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत.
स्वतंत्र आराखडे तयार करण्याचे निर्देश
या तिन्ही ठिकाणच्या मच्छीमार आणि विक्रेत्यांच्या गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र आराखडे तयार करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी समन्वयाने प्रस्ताव तयार करावेत. स्थानिक आमदारांसोबत त्यांचा आढावा घेऊन मान्यतेनंतर प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित जागांची पाहणी करून त्या ग्रामपंचायत, मत्स्य संस्था किंवा अन्य विभागाच्या मालकीच्या असल्यास आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे मिळवण्याचे निर्देश देण्यात आले.
निधीसाठी पर्याय तपासण्याच्या सूचना
बैठकीत ग्रामपंचायत क्षेत्रातील मत्स्य बाजारासाठी सुमारे 3 कोटी रुपये, तर नगरपालिका क्षेत्रातील बाजारासाठी सुमारे 5 कोटी रुपयांची प्राथमिक गरज असल्याचे आमदारांनी सांगितले. 3 कोटींच्या प्रकल्पासाठी 25 टक्के हिस्सा म्हणजे 75 लाख रुपये होतात. हा निधी तसेच उर्वरित खर्चासाठी जिल्हा नियोजन समितीसह उपलब्ध आर्थिक पर्याय तपासण्याची सूचना मंत्र्यांनी केली.
तांत्रिक अडचणी आल्यास मत्स्यव्यवसाय आयुक्त आणि मंत्रालयाशी तत्काळ संपर्क साधावा. डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन प्रस्तावांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल, असेही नितेश राणे यांनी सांगितले.