अवघ्या 53 चेंडूंमध्ये 204 धावा आणि 28 षटकार; पोराच्या वादळाने सूर्यकुमार यादवही म्हणाला, "आता तू माझी प्रेरणा आहेस"

दोहा मधील एसीसी रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये भारताच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी ने संयुक्त अरब अमिराती विरुद्ध 204 धावांची ऐतिहासिक खेळी करत लिस्ट A क्रिकेटचे विक्रम उद्ध्वस्त केले. अवघ्या 28 चेंडूंमध्ये शतक आणि 52 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावणाऱ्या या पोराला सूर्यकुमार यादवस पासून ते दिग्गजांपर्यंत सर्वांनीच सलाम केला आहे.

दोहा येथे सुरू असलेल्या एसीसी रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 मध्ये भारताच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने संयुक्त अरब अमिराती विरुद्धच्या सामन्यात 53 चेंडूंमध्ये 204 धावांची तुफानी खेळी करत लिस्ट A क्रिकेटचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. वैभवने अवघ्या 28 चेंडूंमध्ये (6.3 षटकांत) आपले शतक पूर्ण केले. यासह त्याने ऑस्ट्रेलियाच्या जेक फ्रेझर-मॅकगर्कने 2023 मध्ये नोंदवलेला 29 चेंडूंतील शतकाचा विक्रम मागे टाकत लिस्ट A क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा नवा विक्रम रचला.


या युवा खेळाडूचा तडाखा इथेच थांबला नाही; त्याने 40 चेंडूंमध्ये 150 धावांचा टप्पा ओलांडला. गेल्या वर्षी बिहार कडून खेळताना अरुणाचल प्रदेश विरुद्ध त्याने 59 चेंडूंमध्ये 150 धावा केल्या होत्या, तो स्वतःचाच विक्रम त्याने 19 चेंडूंनी सुधारला.






द्विशतक आणि षटकारांचा पाऊस


केवळ 52 चेंडूंमध्ये त्याने द्विशतक पूर्ण केले. याआधीचा विक्रम न्यूझीलंडच्या चॅड बोव्सच्या नावावर होता, ज्याने फोर्ड ट्रॉफीमध्ये कॅन्टरबरी कडून खेळताना ओटागो विरुद्ध 103 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावले होते. वैभवने हा विक्रम निम्म्याहून अधिक वेगाने मागे टाकला.


या ऐतिहासिक खेळीदरम्यान वैभवने 7 चौकार आणि तब्बल 28 षटकार लगावले. लिस्ट A क्रिकेटच्या एका डावात एखाद्या फलंदाजाने मारलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. याआधी 2018 मध्ये डार्सी शॉर्टने एका डावात 23 षटकार मारण्याचा विक्रम केला होता, जो वैभवने मोडीत काढला. शेवटी तो 204 धावांवर बाद झाला, पण तोपर्यंत त्याने विक्रमांच्या पुस्तकात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले होते.





सूर्यकुमार यादवसह दिग्गजांचे कौतुक


भारताचा T20 विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवने X वर लिहिले, "वैभव सूर्यवंशी, आता तू माझी प्रेरणा आहेस. काय जबरदस्त खेळाडू आहेस! #special" माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांनीही त्याचे भरभरून कौतुक केले. लहान वयात द्विशतक झळकावणे हे वैभवच्या निर्भय मानसिकतेचे आणि असाधारण क्षमतेचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी त्याला मोठी स्वप्ने पाहत राहण्याचा आणि चमकत राहण्याचा सल्ला दिला. मोहम्मद कैफ म्हणाला की, 53 चेंडूंमध्ये 204 धावा आणि 28 षटकार मारणारा वैभव विक्रम मोडण्याची वाट पाहत नसून क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहित आहे आणि तो भावी सुपरस्टार आहे. तर एस. बद्रीनाथ म्हणाला की, वैभवच्या सध्याच्या कामगिरीचे वर्णन करायला शब्द अपुरे पडत असून त्याने अशीच प्रगती करत देशाचा अभिमान वाढवावा.

Comments
Add Comment

Vaibhav Sooryavanshi: सर्वात जलद द्विशतकानंतर वैभव सूर्यवंशीचे नवे टार्गेट; आता मोडणार 'हे' दोन मोठे विक्रम?

[caption id="attachment_1079042" align="aligncenter" width="800"] वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत मूर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण तंतोतंत लागू होते. आशिया

सेहवागच्या लेकाची धमाकेदार एन्ट्री, तर स्टार्क-हेड बाहेर! IPL 2027 च्या लिलावापूर्वी सर्वात मोठे ट्विस्ट!

मुंबई: आयपीएल 2027 (IPL 2027) च्या लिलावासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना क्रिकेट वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर

IPL 2027: पारस म्हाम्ब्रे पंजाब किंग्सचे गोलंदाजी प्रशिक्षक होणार! मिनी लिलावापूर्वी घडामोडींना वेग

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पंजाब किंग्स फ्रेंचायझी सुरूवातीपासून खेळत आहे. मात्र मागच्या 19 पर्वात पंजाब

अहिल्यानगरमध्ये कुस्तीचा थरार! 191 कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय निवड चाचणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने भिस्तबाग, पवननगर येथील संभाजी महाराज कुस्ती

काही वेगळे नाही...! झंझावाती द्विशतकी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीने अशा भावना मांडल्या

आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत आणि युएई यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल युएईने जिंकला

द्विशतक, षटकार आणि बरंच काही..! आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीकडू विक्रमाचा पाऊस

[caption id="attachment_1078717" align="aligncenter" width="800"] आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या वादळापुढे युएईने गुडघे टेकले.