मुंबई: आयपीएल 2027 (IPL 2027) च्या लिलावासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना क्रिकेट वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहेत. टीम इंडियातील दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागने IPL 2027 च्या लिलावासाठी आपले नाव नोंदवले आहे. नुकत्याच पार पडलेल्या अंडर 19 आशिया कपमध्ये आर्यवीरने जबरदस्त कामगिरी करत 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट'चा किताब पटकावला होता. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 1 गडी राखून थरारक विजय मिळवला होता. त्या सामन्याचा हिरो ठरलेला मोहित उलवा याचेही नाव लिलावाच्या यादीत समाविष्ट आहे.
IPL 2027: पारस म्हाम्ब्रे पंजाब किंग्सचे गोलंदाजी प्रशिक्षक होणार! मिनी लिलावापूर्वी घडामोडींना वेग
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पंजाब किंग्स फ्रेंचायझी सुरूवातीपासून खेळत आहे. मात्र मागच्या 19 पर्वात पंजाब किंग्सच्या पदरी निराशा पडली आहे. पंजाब ...
दुसरीकडे, अंडर 19 एशिया कप 2026 च्या संघातील काही महत्त्वाच्या चेहऱ्यांनी मात्र या लिलावापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि भारतीय क्रिकेटमधील 'द वॉल' राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याने सुद्धा लिलावासाठी नोंदणी केलेली नाही. याशिवाय अंतिम सामन्यात चमकदार खेळी करणारा मनाल चौहानदेखील लिलावासाठी स्वत:ची नोंदणी केलेली नाही. मात्र, काव्यान पटेल याने नाव नोंदवले असून, या युवा खेळाडूंनी आपली मूळ किंमत (बेस प्राइस) 30 लाख रुपये निश्चित केली आहे. या सर्व खेळाडूंना कोणत्या IPL 2027 मधील टीममध्ये खेळण्याची संधी मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अहिल्यानगरमध्ये कुस्तीचा थरार! 191 कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय निवड चाचणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने भिस्तबाग, पवननगर येथील संभाजी महाराज कुस्ती केंद्रात 15 व 20 वर्षे वयोगटातील ...
अनुभवी खेळाडूंच्या यादीत डेव्हिड वॉर्नरचे नाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. वॉर्नरने आयपीएल लिलावासाठी नोंदणी केली असून, त्याने आपली बेस प्राइस 2 कोटी रुपये ठेवली आहे. त्याच्यासोबतच ऑस्ट्रेलिया संघातील T-20 मध्ये पदार्पण केलेल्या भारतीय वंशाचा खेळाडू निखिल चौधरी आणि वेगवान गोलंदाज सोनी बेकर यांनीही लिलावासाठी आपल्या नावाची नोंदणी केलेली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याला काही काळापूर्वीच ब्रिटिश नागरिकत्व मिळाले आहे. त्यामुळे तो इंग्लंडचा खेळाडू म्हणून लिलावात उतरेल, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्याने इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) माध्यमातून आपले नाव पाठवलेले नाही, त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
काही वेगळे नाही...! झंझावाती द्विशतकी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीने अशा भावना मांडल्या
आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत आणि युएई यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल युएईने जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. युएईने ...
दरम्यान, बीसीसीआयने फ्रँचायझींना अशा खेळाडूंची यादी दिली आहे, जे IPL 2027 च्या हंगामात केवळ ठराविक कालावधीसाठीच उपलब्ध असतील. झाय रिचर्डसने केवळ 50 टक्के हंगामासाठी उपलब्ध राहणार असून, त्याने आपली बेस प्राइस २ कोटी रुपये निश्चित केली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँड याने लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे. यापूर्वीच मिचेल स्टार्क आणि ट्रॅव्हिस हेड हे स्टार खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आगामी लिलावात कोणता संघ कोणावर मोठी बोली लावतो आणि कोणत्या खेळाडूंची अनुपस्थिति संघांच्या रणनीतीवर परिणाम करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.